निवडणुका जवळ येत असल्याने जाती धर्मावर चर्चा करून त्यात गुंतवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जाईल.अशा वेळी कार्यकर्त्यांनी विकासाच्या प्रश्नावरती चर्चा करण्यास त्यांना भाग पाडावे — आ.राणाजगजितसिंह पाटील


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- निवडणुका जवळ येत असल्याने जाती धर्मावर चर्चा करून त्यात गुंतवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जाईल.अशा वेळी कार्यकर्त्यांनी विकासाच्या प्रश्नावरती चर्चा करण्यास त्यांना भाग पाडावे,असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

     लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात दि.12 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्ष मेळावा आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी आ.राणाजगजितसिंह पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार होते.तर प्रमुख म्हणुन जि.प.चे अध्यक्ष नेताजी पाटील,उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष राहुल पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अच्युत साठे,उपनगराध्यक्षा नाजमिन शेख,नगरसेविका आरती गिरी, उस्मानाबादचे माजी उपनगराध्यक्ष खलिपा कुरेशी,

राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश चिटणीस मसुद शेख,राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयुब हबीब शेख,इलियास पिरजादे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख,युवराज पाटील,कादर
खान,अदि उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी लोहारा तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव,मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष कमलाकर सिरसाट,नागूरचे सरपंच गजेंद्र जावळे, महेबुब फकीर,यांच्यासह शहरातील व तालुक्यातील नागुर,कानेगाव,कास्ती,खेड,धानुरी,बेलवाडी,नागराळ,अदि,गावातील विविध पक्षातील जवळपास दीड हजार कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी सर्वांचा आमदार राणा  जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करुन पक्षात जाहीर प्रवेश देण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शब्बीर गवंडी व सूत्रसंचालन भास्कर माने यांनी केले तर आभार लक्ष्मण रसाळ यांनी मानले.

या कार्यक्रमास नगरसेवक गगन माळवदकर,विजय लोमटे,वडगावचे सरपंच बबन फुलसुंदर,शरीफा सय्यद,बाळासाहेब लांडगे,हेमंत माळवदकर,
अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मुख्तार चाऊस,सतिश
सुर्यवंशी,आश्पाक शेख,निहाल मुजावर,आबेदाबी फकीर,संगिता स्वामी,राजपाल वाघमारे,बाबा कुरेशी, भागवत वाघमारे,हणमंत दनाणे,सलीम कुरेशी,अमिन कुरेशी,निहाल मुजावर,यांच्यासह महिला व नागरीक, कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post