भुषण महाजन
रावेर प्रतिनिधी :- रावेर तालुक्याच्या के-हाळा गावात विजेच्या नियमित होणाऱ्या भारनियमा मुळे नागरिक चांगले च त्रासले आहे लाईन येते इशारा करते अण निघून जाते असा विजेचा लपडाव सध्या के-हाळा गावात सुरू आहे
उन्हाळ्याच्या अखेरीस निर्माण झालेल्या डि पी, नादुरुस्तीचा फटका सहन करून वीजपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या के-हाळा वासियाना पावसाळ्यातील तांत्रिक बिघाडाचा फटका सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होताच के-हाळा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले असून या भागामध्ये काही ठिकाणी वीजवाहिन्यांमध्ये दोष निर्माण होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
वीज वापर कमी होत असताना भारनियमन असलेल्या भागातील वीज ग्राहकांना भारनियमनातून सुटका होण्याची शक्यता असते. मात्र यंदा वारंवार होत असलेल्या गावातील डि पी बिघाडामुळे भारनियमन नसलेल्या भागातील नागरिकांनाही अघोषित भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. के-हाळा गावात दिवसातून 7-8 वेळा वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असून अन्य भागांमध्ये ही परिस्थिती कायम आहे.
के-हाळा परिसरात पावसाच्या पहिल्याच रात्री साडेचार तासांहून अधिक काळ या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असले तरी हा भारनियमनाचा प्रकार नसून उन्हाळ्यामध्ये वीजनिर्मिती केंद्रात झालेल्या बिघाडाचा हा फटका आहे. तो पूर्ववत होण्यासाठी अर्धा ते एक तास वेळ लागतो. तसेच मोठय़ा पावसाची, वादळाची शक्यता निर्माण झाल्यास अपघात होऊ नये यासाठीही काही वेळा वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे हा त्रास नागरिकांनाच होतो,असे प्रत्येक नागरिक समजु शकतो मात्र रोज होणाऱ्या या लप डावा मुळे नागरिक चांगले सतापले आहे
