लोहारा तालुक्यातील जेवळी येथील एका महिलेचा स्वाईन फ्लुने पुणे येथे उपचारा दरम्यान मृत्यु


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील जेवळी येथील स्वाईन फ्लुने बाधीत एका महिलेचा पुणे येथील खाजगी  रुग्णालयात उपचारा दरम्यान दि.25 सप्टेंबर रोजी घेत सकाळी आठ वाजता उपचारा दरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात हा स्वाईन फ्लूवचा पहिलाच बळी असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.यामुळे पसरतील नागरीकात मात्र भितीचे वातावरण पसरले आहे.

      जेवळी येथील एका साठ वर्षीय वृध्द महिला (महितीसाठी - पद्मावती बसवणप्पा देसाई) या पंधरा दिवसापूर्वी ताप,सर्दी,खोकल्याने त्रस्त होत्या. सुरवातील येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेतला परंतु हा आजार वाढल्याने व श्वसना त्रास होत असल्याने दि.10 सप्टेंबर रोजी त्यांना उमरगा येथील खाजगी दवाख्यात दाखल करण्यात आले होते. येथील डॅाक्टरांनी स्वाईन फ्लूवचा लक्षण असल्याने उपचारसाठी या रुग्णास पुढे घेऊन जा असा सल्ला दिला.

या नंतर या रुग्णास नातेवाईकांनी दि.13 सप्टेंबर रोजी पुणे येथील (आदित्य बिर्ला) खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता येथे रुग्णास स्वाईन फ्लूव झाल्याचे अधिकृत निधान झाले होते.ही बाब आरोग्य विभागाकडे पोचल्या नंतर दि.15 सप्टेंबर रोजी जिल्हा आरोग्य विभागाची पथक जेवळी येथे भेट देऊन या बाबत आढवा घेतला होता. दि.25 सप्टेंबर रोजी या महिलेची उपचारा दरम्यान पाहाटे पासून या रुग्णाच्या प्रकृतीत नाजूक बनली. अखेर सकाळी आठ वाजता या रुग्णाचा निधन झाले. स्वाईन फ्लूवचा जिल्ह्यात हा पहिलाच बळी असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.या गाव व परिसरात सात रोगाची अनेक रुग्ण बाधित आहेत. परंतु येथील स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाय योजनेकडे आरोग्य विभाग व येथील ग्रामपंचायत प्रशासन गांभीर्य पाहात नसल्याने नागरीकात संताप व्याक्त होत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post