रावेरात चोरट्याचा धुमाकूळ ज्वेलर्स च्या दुकानातून चोरट्यानी लांबवली 90 हजारांची चैन



  • दागिणे पाहण्याच्या बहाण्याने सराफाला घातला गंडा : सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू

रावेर- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील सराफा दुकानातून तीन चोरट्यांनी 90 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन लांबवण्याची घटना 11 रोजी दुपारी घडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात भारती ज्वेलर्स या दुकानात 11 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दोन महिलांसह एक पुरूष दागिणे घेण्याच्या निमित्ताने दाखल झाले. सराफा दुकानदाराची नजर चुकवून भामट्यांनी तीन तोळे वजनाची व 90 हजार रुपये किंमतीची चैन लांबवली. करण गनवानी यांच्याफिर्यादीवरुन रावेर पोलिसात अज्ञातच चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव व सहकारी तपास करीत आहे.

चोर्‍या वाढल्या : जनता भयभीत
रावेर शहरासह परीसरात चोर्‍यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चोरट्यांनी शहराप्रमाणे ग्रामीण भागातही मोर्चा वळवल्याने ग्रामस्थ भयभीत झाले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post