उस्मानाबादेत राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषदेत 12 ठराव मंजूर


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद शहरातील नगर परीषदेतील शिवाजी छत्रपती नाट्यग्रहात दि.1 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य स्तरीय मुस्लिम आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेत एकुण 12 ठराव मंजुर करण्यात आले.


मुस्लिम समाजाच्या विविध विषयावर चर्चा व्हावी व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने या एकदिवशीय मुस्लिम आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेची सुरवात कुराणची आयात चे पठाण करून करण्यात आली.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.हुसेन दलवाई होते.तर प्रमुख म्हणुन व्यासपिठावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ता माजी मंत्री नवाब मलिक,समाजवादी पार्टीचे आ.आबु आजमी,आ.बाबाजानी दुर्राणी,आ.डॉ.
वजाहत मिर्झा,आ.आरीफ नसिम खान,मोहसीन खान,हासीफ नदाफ,अँड.फरहत बेग,इकबाल अन्सारी,इलियास इनामदार,स्वागत अध्यक्ष उस्मानाबाद कळंबचे आमदार राणाजगजीतसींह पाटिल,आ.राहुल मोटे,आ.तौफिक आस्लम,जब्बार काझी,अजीज पठाण,सक्षणा सलगर,डाँ.स्मिता शहापूरकर,विश्वासअप्पा शिंदे आदी,उपस्थित होते.


या राज्यस्तीय मुस्लीम आरक्षण परिषदेत पुढील ठराव मांडण्यात आले.
 1) मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रथमिक ते उच्च शिक्षणापर्यत शिक्षण मोफत करावे 2) सच्चर समिती रंगनाथ मिश्रा आयोग व डाँ महेमुद रहैमान अभ्यास गटाने मुस्लिम समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासाची विदारक स्थीती देशापुढे सादर केलेली आहे.मुस्लिम समाजिक व शैक्षणिक द्रष्ट्या मागास आसल्याचे नमुद करून त्यांना आरक्षणाची आवश्यकता व्यक्त केली आहे. समस्त मुस्लिमांना 10 % आरक्षण द्यावे,आशी मागणी या परिषदेमतर्फे करित आहोत 3) मुस्लीम समाजाचे आर्थिक व शैक्षणिक द्रष्ट्या मागास आसल्याचे सीद्द झाल्याने त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळ सक्षम करून प्रत्येक वर्षी दोनशे कोटी निधी द्यावे 4) राज्यात लाखो एकर वक्फ जमीनी आहेत सदर जमीनीवर शासन शासकिय निमशासकिय व खाजगी व्यक्तीची आतिक्रमण आहेत जिल्हा पातळीवर वक्फ मालमत्तेचे सर्वेक्षण करून जिल्हानीहाय वक्फ मालमत्तेची यादी जाहिर करावी सदर जमीनीवरील अतिक्रमण हटवून मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व विकासासाठी उपयोगात आणावी 5) मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी sc /st च्या धरतीवर सर्व सोयीनियुक्त शासकिय वस्तीग्रहे मुली व मुलांसाठी सुरु करावे 6) आरक्षण, शिक्षण व संरक्षण या मुद्यावर न्यायालयीन प्रक्रीयेसाठी राज्य पातळीवर तज्ञ वकिलांची तज्ञांची फळी तयार करण्यात यावी 7) मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर  लढणारे सर्व सामाजीक कार्यकरते राजकिय कार्यकरते सामाजीक संघटना उलेमा विचारवंत यांना भविष्यात एकत्र आणुन राज्यात आंदोलनाची दिशा ठरवून त्याची आधिक तिव्रता वाढवण्यात यावी 8) आरक्षणासाठी तालुका जिल्हा व राज्य पातळीवर सह्यांचे निवेदन देण्यात यावे तसेच समाजाच्या प्रबोधनासाठी विभागवार मुस्लिम आरक्षण परिषदा आयोजन करण्यात याव्यात 9) मुस्लिम व ख्रीश्चन समाजातील अनुसुचीत जातींना राष्ट्रपती चे 1950 च्या आद्यादेशाने सवलतीपासून वंचीत ठेवण्यात आलेले आहे सदर आद्यादेश त्वरीत मागे घेऊन मुस्लिम / ख्रिश्चन समाजातील मेहत्तर लालबेगी खाटिक चिकवाचीकवी हलालखोर बहना वगैरे जमातीना आनुसुचीत जातीचे सवलती देण्यात याव्यात 10) राज्यात व केंद्रात अल्पसंख्यांकांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थ संकल्पात 15% निधी राखीव करण्यात यावा 11) जिल्हा पातळीवर पंधरा कलमी कार्यक्रमाची क्रतीशील प्रखरपणे अमलबजावणी करावी 12) सच्चर समितीने सुचविल्याप्रमाणे समान संधी आयोगाची स्थापना करण्यात यावी असे एकुण 12 ठरावाचे वाचन कार्यक्रमाचे अध्यक्ष खा.हुसैनी दलावाई यांनी केली.
या सर्व ठरावास सर्वानुमते मंजुर करण्यात आले.
 दरम्यान या परिषदेला उस्मानाबाद येथील मराठा आरक्षण समितीच्या पदाधीकाऱ्यांनी परिषदेचे आध्यक्ष दलवाई यांना मुस्लीम आरक्षणाला जहिर पाठिंबा दिला.या एकदिवशीय राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषादेसाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या पदाधीकाऱ्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास मुस्लीम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post