मुरुम येथे श्रावण मास निमित्त पुराण सोहळा विविध सामाजिक कार्यक्रम घेवुन संपन्न होत आहे


इकबाल मुल्ला
लोहारा/उमरगा प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरूम येथील कपिलेश्वर मंदिर येथे श्रावण मास निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम घेवुन पुराण सोहळा संपन्न होत आहे.हा सोहळा दि.13 ऑगस्ट पासून सुरु आहे.या पुराण सोहळ्यानिमित्त दि.31ऑगस्ट रोजी जुन्यापध्दतीने ज्वारीची रास करण्यात आली.या खळ्या मधे बैलांना फिरवून राशी करण्यात आली.
या कपिलेश्वर मंदिर येथे दररोज हजारो भाविक पुराण ऐकण्यासाठी येत आहेत.या दरम्यान दररोज हजारो लोकांना महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे.मुरूम व परिसरातील अन्नदातांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे.
सर्व धर्म समभाव अशा कार्यक्रमाने व पंडितरत्न विश्वनाथ शास्त्री यांच्या मधुर वाणीने मुरूम शहरातील पुराण श्रोते भारावून गेले आहेत.


पंडितरत्न विश्वनाथ शास्त्री आपल्या मधुर वाणीने पुराणातील महापुरुषांचे जीवनावरील वास्तव्य हुबेहूब आपल्या वाणीतून रेखाटत असून,चांगले समाज घडवण्याचे सुसंस्कारिक पुराणाचे नागरिक आनंदाने आत्मसात करीत आहेत.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती व हनुमान मित्र मंडळाचे युवक परिश्रम घेत आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post