यवतमाळ :- यवतमाळ येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. महेश शाह यांची पत्नी डॉ. सारीका महेश शाह यांनी मुंबई येथे आयोजीत मिसेस भारत आईकॉन मिसेस ईनस्पायरेशनचा खिताब नुकताच जिंकला आहे. महिलांना लग्नानंतर पुढे जाण्यासाठी खूप संधी आहे. या विचारांनी रॉयल हेरिटेज ग्रुप ऑफ इंडियाने मुंबई येथे मिसेस भारत आईकॉन ही प्रतियोगिता आयोजित केली होती. मुंबई येथील सहारा इंटरनॅशनल हॉटेल येथे तीन दिवस ही स्पर्धा घेण्यात आली. या ग्रॅन्ड फिनाले मध्ये सिनेतारीका जगतचे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन आईफा अवार्डचे फेम्स एंकर सिमरन आहुजा यांनी केले. कोरियोग्राफर अलिशा राऊत हे होते.
स्पर्धेसाठी लागणारे सर्व डिझायनर ड्रेसेस फेमस बॉलीवूड डिझाईनर जेसल वोरा, टिना रॉका यांचे होते. या स्पर्धेमध्ये देश व प्रदेशातील 31 स्पर्धकांनी मिसेस कॅटेगीरीला भाग घेतला होता. स्कीन आणि हेअरच्या मार्गदर्शनासाठी त्वचा क्लिनीक मुंबईचे डॉ. अमित करकनिस होते. फाईनल ज्युरीमध्ये फेमस डिझाईनर अर्चना कोचर, रेखा गुप्ता, रिता गंगवानी आणि रोहित वर्मा होते.
मिसेस भारत आईकॉन मिसेस इनस्पायरेशन खिताब जिंकल्याबद्दल डॉ. सारिका शाह यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. इतक्या मोठ्या स्तरावर भाग घेणारे विदर्भातले एकमेव स्पर्धक म्हणून डॉ. सारिका शाह यांचे नाव अग्रक्रमांकावर येते. या स्पर्धे मागील महिलांनी पुढाकार घ्यावा, महिलांच्या कॉन्फीडन्स मध्ये वाढ व्हावी हा उद्देश होता. बेटी बचाओ, बेटी पढाओ हा या स्पर्धेचा मुख्य हेतु होता. डॉ. सारिका शाह यांनी यवतमाळ जिल्ह्यात अवयवदान प्रकल्प तसेच दिव्यांगासाठी तसेच सर्व सामान्य गरीब परिवारातील विद्यार्थ्यांसाठी आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्य
