यवतमाळ :- नूरबानो दोसानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ अमर बॅटरी सेंटरचे संचालक श्री.अमीरअली दोसानी यांचेकडून समर्थ व्यायाम शाळेस शित शवपेटी दान करण्यात आली.यावेळी न.प.विरोधीपक्ष नेते चंद्रशेखर चौधरी यांनी शित शवपेटीची उपयुक्तता आपल्या मनोगतातून विशद केली.
सदर शवपेटी लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी समर्थ व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री.जगदिशभाऊ टोम्पे तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका तथा महिला काँग्रेस शहराध्यक्षा उषाताई प्रवीण दिवटे,नगरसेविका सौ.दर्शनाताई इंगोले,नगरसेविका सौ.वैशाली सवई, नगरसेवक विशाल पावडे,व्यायाम शाळेचे संचालक प्रशांत काळे,पिंटू कुळकर्णी,विजय राजूरकर,रामा नेरकर,डॉ.संदीप तेलगोटे इत्यादी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
