अतुल नवघरे
लाखपुरी : २९ , मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथे दरवर्षी प्रमाणेश्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपन्न होमारी यात्रा यंदा श्री. लक्षेश्वर संस्थान लाखपूरी येथे कावड यात्रा महोत्सव दिनांक २ सप्टेंबर २०१८ रोजी संपन्न होणार आहे. त्याकरिता आज दि. २८-८-२०१८ रोजी मुर्तिजापुर ग्रामिणचे ठाणेदार नितीन पाटील साहेब व एस. पी . नारायण सर यांनी कावड यात्रेकरिता पार्किग व्यवस्था,नदीकडील रस्ता,मंदीर ते फाटयापर्यतच्या रस्त्याची पाहणी केली व कावड यात्रेदरम्यान येणाऱ्या समस्यांवर सुचना केल्या. या बैठकीकरिता सरपंच दिनेशसिंह चौहान,पोलीस पाटील दिगंबरराव नाचणे,तंटामुक्ती अध्यक्ष नजाकत पटेल,पांडूरंगराव अवघड,पुरुषोत्तमजी डागा,कैलास तामसे,ओम बनभेरु,प्रेमनारायण कैथवास,सुरज कैथवास,दिलीप सुरजुसे,पंजाबराव अवघड,नाना मेहर,महादेव सुरजुसे,सुरेश जामनिक,बाबाराव तामसे व बऱ्याच प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
