कळंब :- कळंब येथील जैन स्थानकामध्ये छत्तीसगढ प्रवर्तक श्रमणरत्न गुरूवर्य रतनमुनीजी म. सा. आदिठाणा 5 चार्तुमासानिमित्त विराजित असून जप व तप आराधणेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर धर्म आराधणा होत आहे. रक्षा बंधनाच्या शुभदिनी धार्मिक रक्षाबंधन पर्वाचे आयोजन तसेच तप आराधनेच्या पच्चखान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित विशाल जैन समुहाला प्रवचनातुन मार्गदर्शन करतांना उपप्रवर्तक डॉ. सतिशमुनीजी म. सा. यांनी आपल्या प्रवचनातुन रक्षाबंधनाचे महत्व विषद करून पर्यावरणाचे रक्षण कसे करावे, धार्मिक ग्रंथाला रक्षासुत्रात कसे बांधावे याबाबत सखोल मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी सौ. रेखा सुरेशचंद्र ललवाणी यांच्या 31 उपवासाचे पच्चखान तसेच ताराबाई देविचंद कोठारी यांच्या 9 उपवास, सौ. किरणबाई शांतीलाल चुरडिया 17 उपवास, गौतम लुनावत 7 उपवासाची तप आराधना मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याप्रसंगी तपस्वी बंधु-भगिनींचे अभिनंदन स्वागत सत्कार चातुर्मास समिती कळंबच्या वतीने करण्यात आले. तपस्वी बंधु-भगिनींचे सौ. कविता नरेंद्र कोठारी सौ. आरती ढढ्ढा, सौ. सिमा रेदासनी, कु. भाविका ललवाणी, सय्यम छल्लाणी, नमिता रेदासनी, प्रेमचंद खतोड, प्रफुल बोथरा, गौतम खाबेया यांनी तप आराधने बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कळंब येथील जैन महिला मंडळाने वृक्षाला राखी बांधुन पर्यावरणाचे रक्षण कसे करावे, हे पटवुन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र कोठारी, धरमचंद कोठारी, प्रविण कोठारी, विरेंद्र कोठारी, डॉ. सुरेशचंद ललवाणी, मानकचंद कोठारी, विजय कोठारी, आदिंनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन जितेंद्र गेलडा यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने यवतमाळ जिल्ह्या
धार्मिक ग्रंथाला रक्षासुत्र बांधावे-डॉ. सतिष मुनीजी म. सा.