वृत्तवाहिनीच्या पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध - कारवाई करण्याची मागणी


 मुर्तीजापुर :- अमरावती येथील एका कार्यक्रमात टीव्ही ९ या वृत्तवाहिनीच्या दोन प्रतिनिधींवर हल्ला करून त्यांना मारहाण करत धक्काबुक्की केल्याची अतिशय गंभीर घटना घडली. या घटनेचा मूर्तिजापूर येथील पत्रकारांनी एकत्र येत तीव्र निषेध नोंदवून राज्याचे मुख्यमंत्री यांना येथील उपविभागीयअधिकारी यांचेमार्फत निवेदन देण्यात आले.अशा प्रवृत्तींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.                                                                                           लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या प्रसार माध्यमांना आणि प्रतिनिधींना मुक्त स्वच्छंदपणे पत्रिकारिता करणे किंवा मते व्यक्त करणे अद्यापही जिकिरीचे ठरतेआहे. माध्यमांची मुस्कटदाबी करून काही वृत्ती सतत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अद्यापही सतत वृत्तपत्र प्रतिनिधींना अशा प्रवृत्ती लक्ष करून दहशत निर्माण करीत पूर्ण स्वातंत्र्याने काम करण्यास अडथळा निर्माण करतात किंवा मनोधैर्य खच्चीकरण करतात. अशा या अपप्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करणे व त्यांना ठेचून काढणे हे निकोप लोकशाही करता आवश्यक आहे.अमरावती येथील tv9 चे प्रतिनिधी यांच्यावर एका कार्यक्रमादरम्यान भ्याड हल्ला करण्यात येऊन राहुल झोटी व सुरेंद्र आकडे यांना मारहाण करून धक्काबुक्की करण्यात आली. सदर प्रकार हा अत्यंत चुकीचा असून निंदनीय आहे. या घटनेचा मुर्तिजापूर येथील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. लोकशाही मूल्यांना हरताळ फासणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई व्हावी तसेच पत्रकार संरक्षण कायदा तात्काळ अमलात आणल्या जावा अन्यथा लेखणीबंद आंदोलन आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यावतीने नायब तहसीलदार डाबेराव व नायब तहसीलदार फडतरे यांनी स्वीकारले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विकास सावरकर, दिलीप देशमुख ,प्राध्यापक दीपक जोशी, प्राध्यापक अविनाश बेलाडकर, अनिल अग्रवाल, विलास नसले, जयप्रकाश रावत, दीपक अग्रवाल, उमेश साखरे, गौरव अग्रवाल,अंकुश अग्रवाल,अथरखान ,मुन्ना महाजन, मोईजशेख  निलेश सुखसोहळे, संजय उमक, मोहिबुल हक, संतोष माने, गजानन गवई, प्राध्यापक एल डी सरोदे यांची उपस्थिती होती

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post