पावसाळी अधिवेशनात १८ वर्षांत सर्वाधिक काम


नवी दिल्ली :- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली. हे अधिवेशन गेल्या १८ वर्षांतील सर्वाधिक यशस्वी अधिवेशन ठरलं आहे. फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या आर्थिक अधिवेशनामध्ये सरकारला फारसे काम करता आलं नव्हतं. पण या अधिवेशनाने मात्र कामकाजाचे सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत.

यंदाचं पावसाळी अधिवेशन १८ जुलैला सुरू झालं तर १० ऑगस्टला संपलं. तब्बल १४ वर्षांनंतर या अधिवेशनात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला.या अधिवेशनात तेलुगू देशम पक्षाच्या (टीडीपी) खासदारांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून निदर्शनंही केली तर एनआरसीच्या मुद्द्यावरून संसदेत खडाजंगीही झाली. पण या सगळ्या गदारोळाचा संसदीय कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही.म्हणूनच हे अधिवेशन गेल्या १८ वर्षातलं सर्वाधिक यशस्वी अधिवेशन ठरलंय. पण तरीसुद्धा तिहेरी तलाक विरोधी विधेयकासारखं महत्त्वाचं विधेयक या अधिवेशनात पास होऊ शकलं नाही

  • काय झालं या अधिवेशनात? 


संसदेत २० विधेयकं मांडली गेली;१८ पास झाली

लोकसभेत नियोजित कामकाजापेक्षा १० टक्के जास्त काम झालं तर राज्यसभेत ६६टक्के जास्त काम झालं

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा बहाल

लोकसभेत ५० टक्के तर राज्यसभेत ४८ टक्के वेळ कायदे निर्मिती

आर्थिक अधवेशनाच्या तुलनेत तिप्पट काम

२६ टक्के विधेयकं संसदीय समितीकडे पाठवली

९९९ पर्सनल बिल संसदेत सादर

या अधिवेशनात झालेल्या कामाबद्दल लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आनंद व्यक्त केला आहे. संसदेचे पुढचे अधिवेशनही यशस्वी होईल अशी त्यांना अपेक्षा आहे. 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post