करी रूपागड़ने जिंकले सत्यमेव जयते चे प्रथम पारितोषिक



  • तेल्हारा तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकावून 10 लाखांच्या बक्षीसांचे मानकरी
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमिर खानच्या हस्ते झाला सन्मान

जितेश कारीया
हिवरखेड़ :- करी रुपागड चे सर्व समर्पित ग्रामस्थ, यांच्यासह नंदकिशोरजी चिपडे, तुलसीदासजी खिरोडकार सर यांच्या पुढाकारातून आणि नेतृत्वात जागर फाउंडेशन,  भारतीय जैन महासंघ, पाणी फौंडेशन, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेड़ चे सर्व पत्रकार बांधव, हिवरखेड विकास मंच, ऑक्सीजन मॅन A S  नाथन, निसर्गप्रेमी क्लब, दिव्यांग समिति, मा जिजाऊ फाउंडेशन हिवरखेड़ पोलिस दल , निशिकांत बड़गे, सविता पेटकर, डॉ अभय पाटिल, अविनाश देशमुख, अभिषेक उदवंत, सोहनलाल पालवे, डॉ श्याम कोल्हे, धनंजय गावंडे, लखन गावंडे, संतोष भोपळे, निखिल ठाकरे पाटिल, सौ उमा संतोष बजाज, पिंपरी चे नागरिक, आणि असंख्य श्रमदात्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या, तन मन धनाने केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेण्यात आली असुन (कर्हि) करी रूपागड़ ता तेल्हारा जि अकोला या गावाने सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेचे तेल्हारा तालुक्यातुन प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.
ग्रामस्थांच्या मते या यशात जागर फॉउंडेशन ने सुरुवातिपासून जल उपचारा करिता लागनारे सर्व साहित्य , श्रमदान, आर्थिक सहकार्य केल्यामुळेच हे संपादन करता आले अशी भावना व्यक्त केली.
पुणे येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेते आमिर खान यांच्या हस्ते लक्ष्मण सोलकर आणि करी रूपागड़ च्या ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सन्मान चिन्ह आणि 10 लक्ष रूपये असे या पुरस्काराचे स्वरुप असुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासना तर्फे आणखी भरघोस बक्षीसे देण्याची घोषणा केली.
या गावात हिवरखेड़ वासियांनी अतिशय आपुलकी ने आत्मीयतेने सहभाग घेतल्यामुळे सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व सहकारी मित्रांनी फटाके फोड़ून जल्लोष केला आणि  एकमेकांवर अभिनंदनाचा वर्षाव केला

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post