अमरावती विभागातील शिष्यवृत्ती चे अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकर सुरु करावी. - एन.एस.यु.आय व युवक कॉंग्रेस ची मागणी.


अकोला :-  13 ऑगस्ट २०१८ रोजी महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय व युवक कॉंग्रेस च्या वतीने सहायक आयुक्त साहेब समाजकल्याण विभाग अमरावती यांना कार्यलयीन अधीक्षक भुजाडे साहेब यांच्या मार्फत निवेदान्द्वारे मागणी करण्यात आली कि अमरावती विभागातील शिष्यवृत्ती चे अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकर सुरु करण्यात यावी.गेल्या तीन चार वर्षापासून शिष्यवृत्ती च्या रक्कमा अनेक विद्यार्थ्यांना मिळाल्या नाहीत.शिवाय अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऐनवेळी बदलल्याने गतवर्षी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला.सन २०१८-१९ चे शैक्षणिक सत्र गेल्या महिन्या पासून सुरु झाले असुन तरीही शिष्यवृत्ती चे अर्ज भरण्याची प्रक्रिया अजून निश्चित नसून यामुळे अमरावती विभागातील विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे कि अर्ज भरायचे कधी. अमरावती विभागात मोठ्याप्रमाणावर शिष्यवृत्ती धारक विद्यर्थी असल्यामुळे लवकरात लवकर शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया निश्चित करवी व त्या बरोबरच गतवर्षी ऑनलाइन अर्ज भरायला सांगितले होते .त्यापूर्वीच्या शैक्षणिक सत्रात “बार्टी” चे महाइस्कॅल पोर्टल सुरु असल्यामुळे अनेकांनी त्याद्वारेच अर्ज भरण्याची तयारी केली होती .परंतु मध्येच “महा-डीबीटी” हे नवे पोर्टल आल्याने सांगत त्यावर अर्ज भरावे,असे विद्यार्थांना सांगण्यात आले . जे विद्यर्थी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात शिकत होते,त्यांच्या पहिल्या वर्षीच्या नोंदी महाइस्काल वर झालेल्या असल्याने आणि त्या पोर्टल वरील संपूर्ण डाटा महा-डीबीटी वर ट्रान्स्फर न झाल्याने अखेर हि यंत्रणा ढासळली .शेवटी सर्व विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज भरावे लागले . त्या मुळे यावर्षी सर्व विद्यार्थांना ऑनलाइन किवां ऑफलाईन अर्ज भरायचे आहे व ते कधी भरायचे आहे असा प्रश्न पडला व विद्यर्थी सभ्रमात असुन  सदर प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी करण्यात आली .सदर निवेदन हे महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय चे मा.सरचिटणीस निनाद मानकर यांच्या नेतृत्वात दिले व त्यावेळेस जिल्हा युवक काँग्रेस महासचिव निलेश गुहे,बडनेरा युवक काँग्रेस अध्यक्ष समीर जवंजाळ,अमरावती काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष सागर कलाने,स्वप्नील साहू,युवक काँग्रेस अकोट विधानसभा अध्यक्ष प्रतीक गोरे,एन.एस.यु.आय महासचिव संकेत साहू,संकेत बोके,रवी कलाने,मो.दानिश, मयुर मेश्राम,पारस चौंधरी, कुणाल जोत आदींच्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post