अकोला :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अकोल्यामध्ये 72 व्या भारतीय स्वातंत्र्य उत्साहात व नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्याचा मानस नॅशनल इंटीग्रीटी मिशन, वंदे मातरम संघटना, हुशे बंधू ज्वेलर्स, समर्थ चॅरीटेबल ट्रस्ट, ओबीसी संघटना, अकोला जिल्हा, नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ, गौरक्षण रोड, अकोला या सह विविध संघटनेच्यावतीने साजरा करण्यात येत आहे. या वर्षी भारताचे 72 वा स्वातत्र्यंदिनी 72 मीटर (240 स्केवअर फुट) लांबीची विश्वविक्रमी भारताच्या तिरंगी झेंड्याची प्रतिकात्मक रांगोळी जिचा आकार जवळपास 1 एक्कर एवढा असून जवळपास 5 हजारांच्यावर विविध रंगाच्या रांगोळीच्या मदतीने प्रसिद्ध रांगोळीकार प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनात विविध संघटनेतील कार्यकर्ते, विविध शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी तथा गृहीणी ही रांगोळी साकारनार आहे.
या आधी देखील असेच अशक्यप्राप्त वाटणारे देशभक्ती प्रतीचे विक्रम आयोजकांनी यशस्वी केले आहे. यामध्ये आणखी एक विक्रमाची नोंद होणार आहे. या सोबतच 72 व्या स्वातंत्र्यदिनी एकाच वेळी 72 ध्वजारोहणाचा विक्रम देखील आयोजित केला आहे. व त्यामध्ये 72 विविध घटक जसे स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शेतकरी, शासकीय अधिकारी, विधीज्ञ, वैद्यकिय तज्ञ, अभियंता, पत्रकार, साहित्यीक, शिक्षक, क्रीडा क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात विशेष कामगिरी करत असलेले व्यक्तींच्या हस्ते 72 ध्वजारोहण एकचवेळी फडकविण्याचे ठरले आहे. त्यावेळी अकोला जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या व्यक्तींना अकोला भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या अशा विविधतेने नटलेला व भरगच्च कार्यक्रम गौरक्षण रोड येथील, गौरक्षण संस्थेमागील प्रांगणात सकाळी 9.30 वाजता दि. 15 ऑगस्ट 2018 वार बुधवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अकोलेकरांनी सहपरिवार येऊन ज्वाजल्य देशभक्तीच्या यज्ञकुंडामध्ये उपस्थित राहून, सहभागी होवून देशभक्तीची भावना वृद्धींगत करावी असे आवाहन प्रा. डॉ. संतोष हुशे, अॅड. राजेश जाधव, अविनाश देशमुख, उमेश मसने, प्रा. नितीन बाठे, डॉ. योगेश साहू यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयसिंग गुडदे, राजू इटोले, आनंद वानखडे, निशीकांत बडगे, विजय जानी, अवतारसिंग अनरेले, राजेश बस्तरीया, गणेश कटारे, मो. सादीक, नबिल सैय्यद, गणेश कळसकर, इस्माईल ठेकेदार, चंद्रकांत झटाले, प्रशांत प्रधान, निलेश पाटील, जयु ठोसर, जयु खोटरे, ओम नायडू, सोनू कावडे, मोहित राठोड, मयुर बोंडे, प्रविण यादव, प्रविण इंगळे, बाळ काळणे, अमोल सुर्यवंशी, प्रभाकर दलाल, निशांत जाधव,प्रशांत गावंडे, मनिष कांबळे, रुपेश कांबळे, सौरभ काळे, अॅड. सागर काळे, प्रविण वाघमारे, आशु ढोमणे व शेकडोे कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.अशी माहीती प्रसिद्धि प्रमुख शंकर जोगी, सन्दिप देशमुख यान्ही दिली आहे.
