धामणगाव रेल्वे :- समाजातील प्रत्येक मुलगी आपली बहिण व आई असावी अशी शिवजी महाराज यांची शिकवण घेऊन, व ज्या दिवशी प्रत्येकांना समाजातील प्रत्येक मुलगी आपली बहिण समजायला लागले त्यावेळेसच खरे बंधु प्रेम, बंधुभाव कळेल व मुलिंनवर होत असलेले लैंगिक अन्याय, अत्याचार, सुध्दा कमी होतील, सोशल मिडियावर नुसत्या पोकळ हार्दिक शुभेच्छा देऊन होणार नाही .
असा विचार घेऊन पोलिस परिवार सन्मय समीती विभाग धामणगाव रेल्वे यांनी जिल्हा परिषद शाळा निभोंरा बोडखा येथील शाळेतील चिमुकल्या मुलींन कडुन राखी बांधुन घेतली व त्यांना नोटबुक, पेन, पेन्सिल, खोड रबर असे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाला डाॅ संघपाल उमरे, विदर्भ अध्यक्ष पोलिस सन्मय समीती, विशाल बांते पोलिस पाटिल निभोंरा बोडखा, संजय ढिगवार मुख्याध्यापक जि. प. शाळा निभोंरा बोडखा, सचिन बमनोटे ग्रा. प. सदस्य, शुशिल दाभाडे, ठकनाईक मॅडम, शिंगाडे मॅडम, रोंघे मॅडम,राठी सर व पोलिस परिवार सन्मय समीती धामणगाव रेल्वे विभागाचे पदाधिकारी अंकुश अलोणे धामणगाव रेल्वे ता. उपाध्यक्ष, दर्शन दाभाडे मंगरुळ दस्त.
पोलिस स्टेशन विभागाचे उपप्रमुख, अंकुश डोंगरे, गोलु उरर्कुटकार, किरण दाभाडे, प्रमोद चवरे, निलेश पाडवार, दिनेश झेले, जगदीश गेटमे, सुनिल लोणारे व गावातील मिञ मंडळी यांनी ह्या कार्याला मदत व सहकार्य केले .