
धामणगाव रेलवे :- व्यक्तीचा शेवट ज्या ठिकाणी होतो, जिथे कोणत्याही समाजाचे वैरत्व नसते, कोणीही एकमेकाचे शञु नसतात, कोणताही वाद नाही, जतीभेद, धर्म भेद नाही असे ठिकाण म्हणजे स्मशानभूमी, या ठीकाणी येणाऱ्या लोकांना उन्हाळ्यात सावलीचा आसरा व्हावा व येणाऱ्या जाणाऱ्यांना सोयी चे व्हाव असे समाज हिताचे उधिष्ठ ठेवून निभोंरा बोडखा गावातील शांतता व सुरक्षा समिती चे पदाधिकारी व ग्रा. पंचायत सदस्य व गावतील युवकांनी गावातील स्मशानभूमीची व परिसराची साफसफाई व स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण केले.
डाॅ संघपाल उमरे, अमरावती जिल्हा अध्यक्ष पञकार संरक्षण समिती, विशाल बांते पोलिस पाटिल निभोंरा बोडखा, सचिन बमनोटे ग्रा. पंचायत सदस्य, दिनेश झेले राज निभोंरा, सुशिल दाभाडे, व शांतता व सुरक्षा समीती व पोलिस परिवार सन्मय समीतीचे पदाधिकारी अंकुश अलोणे, दर्शन दाभाडे, गोलु उरर्कुटकार, अंकुश डोंगरे, किरण दाभाडे, प्रमोद चवरे, निलेश पाडवार, सुनिल लोणारे, जगदीश गेटमे आदी मंडळींनी या कार्यला सहकार्य व मदतही केली*