दिवंगत प्रविण दिवटे यांच्या द्वितीय स्मरणार्थ विविध उपक्रम..


यवतमाळ :- काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक प्रविण दिवटे यांचे द्वितीय पुण्य स्मरनार्थ मौजा मासोळी, पारधीबेडा व महादेव मंदिर येथे जनहितार्थ विविध उपक्रम राबवून श्रद्धांजली वाहण्यात अली. नगरसेविका तथा यवतमाळ शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा उषा प्रविण दिवटे यांनी पारधीबेडा येथील गरजू विध्यार्थ्यांना शालेय साहित्य,श्रावण मासातील पवित्र अशा तिसऱ्या सोमवारी उपवासास पोषक अशी साबुदाणा उसळ तसेच अंगणवाडीतील बालगोपालांना बिस्कीट वितरित करून 'अन्न हे पूर्ण ब्रम्ह' चा प्रत्यय दिला. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दिवंगत नगरसेवक प्रविण दिवटेचा चाहता वर्ग जिल्हाभर विस्तारित असून अनेक राजकीयांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.
याप्रसंगी नगरसेविका उषाताई प्रविण दिवटे,द्विकन्या कु.सृष्टी प्रवीण दिवटे,कु.श्वेता प्रविण दिवटे,सुमित खंदवे,विश्वास निकम,निशा नाकतोड, आवारी मॅडम,अनिकेत कावळे,मनीष बोन्नकिल्ले,सचिन तोंडरे,सूरज आडे,यश वानखेडे तसेच दादा क्रीडा मंडळ व प्रविण दिवटे मित्र परिवारातील इत्यादी सदस्यगण उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post