लोहारा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रिकेट स्पर्धेत दणदणीत विजय


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील हराळी येथे तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या.या क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा संघाने बसवेश्वर कनिष्ठ   महाविद्यालय जेवळी संघाचा 20 धावांनी पराभव करुन विजय संपादन केले.या क्रिकेट 19 वर्षाच्या विद्यार्थांची घेण्यात आली होती.
 या क्रिकेट स्पर्धेत कर्णधार सर्फराज फकीर व सुरज माने या दोघांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे या संघाला विजय मिळाला.या विजयामुळे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाची निवड झाली आहे.या विजवी संघास प्रशिक्षक पी.जी.काळे व नागनाथ पांढरे यांचे मार्गदर्शन लाभले.या विजयी संघाचे प्राचार्या श्रीमती यु.व्ही.पाटील,प्रा.एस.डी.शिंदे,प्रा.आर.सी.आष्टेकर,
प्रा.डी.व्ही.शिंदे,प्रा.एस.एस.बहिरे,प्रा.व्ही.बी.उंबरे,प्रा.
डी.आर.साठे,प्रा.व्ही.एल.कुन्हाळे,प्रा.व्ही.टी.कलमे, प्रा.यु.व्ही.सोमवंशी,यांच्यासह प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post