श्रावण महिना हा भक्ती — श्रध्दा वाढविण्यासाठी आग्रणीय असतो — लखदिवे गुरुजी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- श्रावण महिना हा भक्ती-श्रद्धा वाढविण्यासाठी आग्रनिय असतो.या महिन्यात संत - महात्मा पासून ते साधारण व्यक्ती पर्यंत सगळेच धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमात व्यस्त असतात म्हणुन श्रावण महिन्याचे महत्व आहे असे प्रतिपादन लखदिवे गुरुजी पाकरसंगवी यांनी केले.
लोहारा शहरातील बसवेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्रीमद वीरशैव लिंगायत धर्म प्रबोधन सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन  दि.16 ऑगस्ट ते दि.23 ऑगस्ट या दरम्यान करण्यात आले आहे. याप्रसंगी ते बोलत होते.


या सप्ताहामध्ये अनादी शिवभक्ती,संस्कृत,कन्नड,मराठी संत महात्मे यांचे विषयी प्रवचन,आष्टावरण पंचाचार,महेश प्रसादी, प्राणलिंगी शरण,परमरहस्य पारायण,परमरहस्य वर प्रवचन,महिला भजनी मंडळ,श्रीमद वीरशैव लिंगायत धर्म प्रबोधन,अदि सामाजिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत.या सप्ताह कार्यक्रमास शहरातील महिला शशिकला माणिकशेट्टी,विजयाबाई माशाळकर,सुरेखा जट्टे,शैला जट्टे,निर्मला स्वामी,रंजना फावडे,संगीता  पाटील,अल्का वैरागकर,महादेवी होंडराव,राजश्री फावडे,सविता फावडे,यांच्यासह शहरातील व  तालुक्यातील महिला परिश्रम घेत आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post