जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अपंग शाळेत रक्षाबंधन साजरा इकबाल मुल्ला


लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्र हा विद्रोही रणरागीणीच्या कर्तुत्वाने जसा घडला गेला आहे तसाच तो त्यांच्या प्रेमळ,मायाळु, स्नेहमय अशा आपुलकीचाही आहे.रक्षाबंधन हा सण बहीणभावाच्या नात्याचा अन अतुट बंधनाचा होय.हा सण अनेकजण आपल्याला घरी आनंदात व उत्साहात साजरा केला गेला.पण अनाथ,अपंग बांधवांच्या भगीनींच्या वाट्यालाही तो आनंददायी क्षण अनुभवास यावा या उदात्त हेतुने जिजाऊ ब्रिगेड लोहाराच्या वतीने तालुक्यातील सास्तुर येथील अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा रंजनाताई हासुरे यांच्या नेतृत्वात अपंग विध्यार्थी विद्यार्थीनीना कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राखी बांधुन हा सोहळा साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे शिक्षक प्रवीण वाघमोडे सर यांनी केले तर प्रमुख उपस्थिती लाभलेले सारीका अंबुरे,वंदनाताई भगत, शरीफा सय्यद यांच्यासह रंजनाताई हासुरे यांनी अत्यंत भावुक असे मनोगत व्यक्त केले तर किरण गायकवाड व मोहन जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची व शिक्षकांची कौतुक करीत त्यांचे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेड माजी जिल्हाध्यक्षा सारीका अंबुरे,जिल्हा संघटक वंदनाताई भगत, तालुकाधक्षा रंजनाताई हासुरे,संभाजी ब्रिगेडचे मोहन जाधव,VBVP चे किरण गायकवाड,शरीफा सय्यद,तालुका संघटक संगीता सुर्यवंशी,नीलम कासार,ज्योती कासार,सुरज सुर्यवंशी,सीताराम बिराजदार, यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post