सुधा चंद्रन यांच्या हस्ते प्रकाशकिरण योजनेचे उद्घाटन


प्रतिनिधि,मक़सूद अली
यवतमाळ: प्रसिध्द सिनेतारका आणि नृत्यांगना सुधा चंद्रन यांनी जांब या गावातील प्रकाशकिरण योजनेचे उदघाटन केले. यावेळी या उपक्रमाचे आयोजक प्रेमासाई महाराज उपस्थित होते. महावीर नगरातील प्रेमासाई यांच्या निवासस्थानी त्यांना राखी बांधून त्यांनी जांब या गावातील प्रकाशकिरण योजनेचे उदघाटन केले.


यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या सामाजिक क्षेत्रातील कार्याचा संबंध लोकसभा निवडणुक लढवण्याशी लावू नका, असे आवाहन प्रेमासाई यांनी केले. मी राजकारणात राहील किंवा राहणार नाही पण सामाजिक आणि अध्यात्मिक कार्याचा घेतलेला वसा कदापि सोडणार नाही असेही त्यांनी सांगीतले. यावेळी अमीत मिश्रा, पुरूषोत्तम टिचुकले, जनार्दन राठोड, हरी राठोड, गायत्री ठाकुर, उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post