आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा एलगार उस्मानाबाद शहरात राज्यस्तरीय मुस्लीम आरक्षण परिषदेचे आयोजन


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मराठा,लिंगायत,धनगर,मातंगासह,मुस्लिम समाजानेही आता आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.आरक्षण पदरात पडल्यानंतरही न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने या समाजात देखील अस्वस्थता पसरली आहे.त्यामुळे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी यापुढील काळात आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी उस्मानाबाद येथे 1 सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषदेचे उस्मानाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणाऱ्या या परिषदेत राज्यातील मुस्लिम समाजाचे सर्व आमदार,खासदार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.परिषदेत मुस्लिम आरक्षण विषयी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे.या परिषदेस राज्यातील मुस्लिम समाजातील सर्व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती उस्मानाबादच्या वतीने करण्यात आले आहे.
या एक दिवशीय मुस्लिम आरक्षण परिषदेचे आयोजन उस्मानाबाद जिल्हा  मुस्लिम आरक्षण समितीचे मसुद शेख,कादरखान भाई,खलिपा कुरेशी,खलील सय्यद (सर), कादरभाई शेख,वाजीद पठाण,बाबा मुजावर, बबलू शेख,हुकुमत मुलानी,अमजद सय्यद,यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने उस्मानाबाद जिल्यातील मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तीनी या परिषदेला उपस्थीत राहण्याचे आहवान केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post