देशाच्या पायाभरणीत स्व राजीवजी गांधीचे योगदान महत्वाचे : प्राचार्य डॉ ए पी देशपांडे



  • यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यशाळेत प्रतिपादन

यवतमाळ :- देशाचे पंतप्रधान स्व राजीवजी गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून माहिती, तंत्रज्ञान व राजीवजी गांधी या विषयावर प्राचार्य डॉ ए पी देशपांडे यांचे व्याख्यान जिल्हा काँग्रेस कमिटी च्या कार्यालयात आयोजित कार्यशाळेत केले.
या वेळी प्राचार्य डॉ ए पी देशपांडे म्हणाले की स्व राजीवजी गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे माहिती, तंत्रज्ञान, संवाद, व बदल या बाबतीत देश जगाच्या बरोबरीत आला त्या वेळी केवळ टेलिफोन हेच संवादाचे प्रमुख साधन होते .


आज प्रत्येकाच्या खिश्यात असलेला अँड्रॉइड फोन म्हणजे राजीवजींना असलेली खरी आदरांजली होय, माहिती व तंत्रज्ञानाच्या या जगात भारतीय शास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणात आपले योगदान देत असून पूर्वी च्या काळी प्रसिद्ध असलेले मेसेंजर याहू हाचा ही मूळ निर्माता भारतीय होता त्याच प्रमाणे सर्वाधिक लोकप्रिय गुगल चा सीईओ भारतीय असल्याचे त्यांनी सांगितले, देशाच्या पायाभरणीत स्व राजीवजींचे योगदान महत्वाचे असून त्यांनी योग्य वेळी माहिती व तंत्रज्ञानाचा पुढाकार घेतला नसता तर आज आपण कदाचित पंचवीस वर्षे मागे राहलो असतो त्यांनी वेळीच विदेशी तंत्र देशात आणले त्याच प्रमाणे होमिओ भाभा सारखे अनेक शास्त्रज्ञ केवळ शोध व प्रात्यक्षिक करण्याला पुढाकार तत्कालीन शासनाने केला ही बाब देशाच्या इतिहासात अत्यंत महत्वाची आहे, 1984 सालच्या पुढे देशात अशांतता होती त्यावर नियंत्रण मिळवीत ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मिझोराम, नागालँड सारख्या प्रदेशातील अराजकता अत्यंत मेहनतीने नियंत्रण मिळविले याची ही नोंद देश विसरू शकणार नाही, या व्यतिरिक्त इतर देशांना सहकार्य करीत उदाहरणे देऊन तेथील अशांतता नष्ट कारणांचा मान त्यांना मिळाला होता, स्व राजीवजी गांधी हे अत्यंत कठीण काळातील यशशवि पंतप्रधान अशी ओळख त्यांनी निर्माण करीत केवळ दोन वर्षात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उंमटवीत देशाला जगाच्या बरोबरीत आणले, व आपल्याच देशात कॉम्पुटर तयार होऊ लागलेत, आज ग्रामीण भागातील ऑनलाइन हा शब्द पोहचविण्यात त्यांचेच योगदान महत्वाचे आहे, आज हवामान खात्याचा अंदाज असो की विमान रेल्वेचे तिकीट असो आपण त्यांचे योगदान विसरुच शकत नाही, त्यांनी 18 वर्षाच्या तरुणाला मतदानाचा अधिकार दिला त्याच प्रमाणे त्यांनी स्थानिक स्वराज संस्थेत महिलांना आरक्षण दिले त्याचमुळे आज आमच्या माता भगिनी नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद सदस्य, सभापती ते जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकलेत असे ते म्हणाले.


या वेळी देशाचे माजी पंतप्रधान स्व अटल बिहारी वाजपेयी यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष आ डॉ वजाहत मिर्झा, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आ किर्तीबाबू गांधी, जी प अध्यक्ष माधुरीताई आडे, माजी जी प उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुलकर, युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल ठाकरे, अशोकराव बोबडे, अरुण राऊत, बाबासाहेब गाडे, चंद्रशेखर चौधरी, अरविंद वाढोनकार, अनिल गायकवाड, दिनेश गोगरकर, अरीज बेग, जितेंद्र मोघे, प्रदीप डंभारे, बालू काळे, नितीन जाधव, वासुदेवराव महल्ले, कृष्णा पुसनाके, जाफर खान, अनिल आडे, बबलू देशमुख, विक्की राऊत, कौस्तुभ शिर्के, रवी ढोक, किरण कुमरे, सिकंदर शहा, बासिद खान, राजेंद्र चव्हाण, इस्थेहाक भाई, जावेद अन्सारी, बबली भाई, यांचे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post