वसंतदादा पाटील महाविद्यालयाच्यावतीने लोहारा शहरात नविन मतदार नोंदणी व मतदान जनजागृती भव्य रँली काढण्यात आली.


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- वसंतदादा पाटील महाविद्यालयाच्यावतीने लोहारा शहरात मतदारामध्‍ये नविन मतदार नोदंणी व मतदान  जन जागृती करण्‍यासाठी दि.28 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांची भव्‍य रॅली काढण्यात आली.
या रँलीचे उदघाटन तहसीलदार शोभा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आपले मतदान,आपला स्वाभिमान,अशा मतदार प्रबोधनपर घोषणा देत ढोल ताश्याच्या आवाजात शहरात मतदार जनजागृती अभियानातंर्गत मतदार जागृती रॅली काढण्यात आली.
मतदार जागृतीचे फलक यामुळे रॅलीचे आकर्षण वाढले होते.यावेळी तहसीलदार शोभा पुजारी म्हणाल्या कि,जास्‍तीज जास्‍त नविन मतदार नोदंणी करावी असे अहवान करुन पुढे म्‍हणाल्‍या की, निवडणूका हा लोकशाहीचा एक महत्वपूर्ण घटक आहे.यात मतदार केंद्रस्थानी असतो,मतदारच आपल्या गावाचे,शहराचे,पर्यायाने देशाचे भवितव्य ठरवत असतो.मतदान हा बहुमोल अधिकार आहे. मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकानी मतदान केले पाहिजे.कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान केले पाहिजे.असे अवाहन यावेळी केले.
मतदारांना मतदान हा केवळ अधिकार नसून राष्ट्रीय जबाबदारी असल्याची शपथ यावेळी देण्यात आली.
यावेळी प्राचार्या श्रीमती यु.व्‍ही.पाटील,नोडल व्‍ही.डी. आचार्य,यांच्यासह शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post