अनवर खान
मूर्तिजापूर :- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी
'महाराष्ट्र बंद'च्या हाकेला येथील सकल मराठा समाज बांधवाचा मूर्तिजापूर बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे शहरात शांततामय मार्गाने कडकडीत बंद ठेऊन बंदला शंभर टक्के प्रतिसाद आपली प्रतिष्ठान बंद ठेऊन नागरिकांना दिला आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. नोकरी व शिक्षणात आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांनी मुर्तिजापूर बंद चे आवाहन केले होते
शांती वातावरणात शहराच्या मुख्य मार्गावर मोर्चा काढून आ हरिष पिंपळे यांच्या कार्यालयात एक तास ठिय्या आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुजन करून
मराठा आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायालयाचे निकाल आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण देतील असे आश्वासन आ हरिष पिंपळे यांनी दीले सदर मराठा मोर्च्यात जवळपास 1500 समाज बांधव सहभागी झाले होते
