ऑल इंडीया कौमी तंजीम विदर्भ विभागाच्या वतीने निवेदन


जिल्हा प्रतिनिधि मक़सूद अली
यवतमाळ(प्रतिनिधी) :  ऑल इंडीया कौमी तंजीम विदर्भ विभागाच्या वतीने मुख्यमंत्री फडणविस यांना मराठा, मुस्लीम व धनगर समाजाला शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्याबाबतची मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एका निवेदनातून करण्यात आली.
मुस्लीम आरक्षणासाठी रंगनाथ मिश्रा आयोग तसेच मराठा आरक्षणासाठी राणे समिती अहवाल व धनगर समाजाला आरक्षण मंजूर करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात कौमी तंजीम विदर्भाचे अध्यक्ष मो.असीम अली यांनी दिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत एजाज जोश, मिर्झा वसीम बेग,असलम मलनस, सकीब मतीन शेख, अकबर शाहीद, जीयाउद्‌दीन   जुनेद अज़ीम, आदी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post