राजुभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा महावितरणच्या अभियंत्यास घेराव...



  • विद्युत पुरवठा व अन्य समस्यांन संदर्भात निवेदन


मारेगाव(यवतमाळ) :- तालुक्यातील मार्डी व कुंभा सर्कल मध्ये महावितरण विभागाकडून शेतकऱ्यांचा विज पुरवठा खंडित करून नाहक त्रास देण्यात येत आहे.एकीकडे पावसाचा लहरीपणा त्यांना मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून सिंचनाची व्यवस्था केली. त्यात महावितरणमध्ये पैसे भरून विज पुरवठा उपलब्ध करून घेतला. सदर विद्युत पुरवढ्याचे देयक शेतकरी नियमित भरतो. परंतु महावितरण विभागातील मस्तवाल अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कुठलेही कारण नसताना हा पुरवठा खंडित केल्या जातो. व खंडित झालेला  पुरवठा महिना - महिना भर सुरू करण्यात येत नाही. याच बरोबर वापराच्या जास्त वीज देयक सामान्य जनतेस व शेतकऱ्यांना देण्यात येत असल्याचा दावा करत आज विभागातील शेतकऱ्यांनी आज मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वात स्थानिक उपविभागीय अभियंत्यास यासर्व मागणीचे निवेदन देण्यात आले. ही सर्व कामे येत्या दोन ते तीन दिवसात न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शेतकऱ्यांच्या वतीने अभियंत्यास कार्यालयात न बसू देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांना मध्ये नामदेव जांभळकर, स्वप्नील ठावरी, वसंता घोटेकर, रमेश भेंडले, सुभाष गाडगे, अशोक राजूरकर, मुरलीधर बलकी, प्रदीप डाहुले(सरपंच) यांच्या सह शेकडो तर मनसेचे अविनाश लांबट, अनंता जुमडे, उदय खिरटकर, गजानन चव्हाण, गणेश खुरपुरे,संतोष रोगे, श्रीकांत सांबाजवर,आकाश खामनकर, चांद बाहदे, निखिल मेहता, रोशन शिंदे, सागर नावडे, किशोर मानकर आदींसह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते...

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post