झुआरी अग्रो केमिकल्स लिमेटड गोवा व झुआरी विक्रेते गजानन कृषी केंद्र लोहारा यांच्यावतीने शहरात ऊस व सोयाबीन पिक परिसंवाद कार्यक्रम संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- झुआरी अग्रो केमिकल्स लिमेटड गोवा व झुआरी विक्रेते गजानन कृषी केंद्र लोहारा यांच्या स्युक्त विद्यमाने शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात शेतकऱ्यांसाठी दि.18 ऑगस्ट रोजी ऊस व सोयाबीन पिक परिसंवाद कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाटन जि.प.चे माजी उपाध्यक्ष अशोक(भाऊ) जवळगे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी केशव पाटील (खेड) होते.तर प्रमुख म्हणुन श्रीमती अपेक्षा कसबे(शास्त्रज्ञ,विज्ञान केंद्र तुळजापुर),अभय काळे(चिफ मँनेजर मार्केट डेव्हलपमेंट विभाग झुआरी अँग्रो केमिकल्स कोल्हापुर),ललीतकुमार पाटील
(अँसिस्टंट मँनेजर झुआरी उस्मानाबाद),माजी पं.स. सदस्य चंद्रकांत पाटील,समन्वय समिती माजी अध्यक्ष नागण्णा वकील,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शंकरअण्णा जट्टे,गुंडप्पा भुजबळ,विलास झिंगाडे, शरणप्पा कबाडे,अदि उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन ललीतकुमार पाटील यांनी केले.तर आभार प्रसाद जट्टे यांनी मानले.


यावेळी श्रीमती अपेक्षा कसबे,अभय काळे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास उमाकांत जट्टे,अनिल जट्टे,प्रशांद जट्टे,अँड.आप्पु जट्टे,
डॉ.मुरलीधर चव्हाण,निळकंठ पाटील,शिवानंद सोळशे,सागर पाटील,बप्पा लोभे,शंकरराव लोखंडे,
मोहन पोतदार,भागवत बनकर,संजय जेवळीकर, विजय फावडे,नाना पाटील,यांच्यासह शहरातील व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post