बांधकाम कामगारांनी विशेष नोंदणी अभियाना मध्ये नोंदणी करुन शासन योजनेचा लाभ घ्यावा


मुर्तिजापुर :-  महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विशेष नोंदणी अभियानांतर्गत 25 लाख कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य कामगार विभागाने पूर्ण करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. राज्यातील बांधकाम कामगारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करावी, असे आव्हान श्री. चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्याक बहुउददेशीय विकास संस्था, मुर्तिजापुर जि. अकोला चे संस्था अध्यक्ष यांनी केले आहे. राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत बांधकाम कामगारांपैकी ज्या बांधकाम कामगारांनी अद्याप मंडळाकडे नोंदणी केलेली नाही, अशा बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करता यावी याकरिता कामगार विभाग - महाराष्ट्र शासना कडून इमारत व इतर बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.केंद्र शासनाने सन १९९६ साली केलेल्या इमारत व इतर बांधकाम कायद्याची अंमलबजावणी राज्याने सन २००७ साली सुरु केलेली आहे. या योजनेमध्ये बांधकाम कामगारासाठी अनेक कल्याणाच्या योजना सुरु केलेल्या आहेत.सदर बांधकाम कामगारांमध्ये जागृती मिर्माण करणे हा शासनाचा उद्देश आहे.
कोणत्या क्षेत्रातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतो. - बांधकाम, फेरफार, दुरुस्ती, देखभाल किंवा पडून टाकणे, इमारत, रस्ते मार्ग, रेल्वे, ट्रामबेज, विमानतळ, जलनिस्सारण , बंधारा, नौकानयन, पूरनियंत्रण , तेल व वायूची जोडणी टाकणे.विद्यूत लाईन्स, वायरलेस,रेडीओ , टेलीव्हिजन, टेलिफोन, टेलीग्राफ, समुद्रापार दळण -वळण, धरणे कालवे , जलाशये , जलप्रवाह, बोगदे, पूल, सेतू, सेतुप्रणाली, पाईपलाईन, टोवर्स, कुलिंग टोवर्स , पारेषण टोवर्स इत्यादी.इमारत व इतर बांधकाम कामे या व्याखेत खालिल बाबींचा समावेश होतो.इमारत व इतर बांधकाम या व्याखेत या उपरोक्त कामांवर काम करणाऱ्या कुशल, अकुशल, अंगमेहनत, इत्यादी कामे करणा-या व्यक्तींचा समावेश बांधकाम कामगार म्हणून केलेला आहे. अशा सर्व बांधकाम कामगारांना या मंडळात नोंदीत होता येईल. नोंदणी करिता  18 ते 60 वर्ष वयोगटातील कामगार 2) मागील बारा महिन्यामध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार अशी पात्रता हवी. नोंदणीकरिता वयाबाबतचा पुरावा  मागील वर्षभरात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र पासपोर्ट आकराचे रंगाती फोटो रहिवासी पुरावा  फोटो ओळखपत्र  बँकेच्या खात्याची छायांकीत प्रत.

नोंदणी झाल्यानंतर सदर खालील कल्याणकारी योजनांचा लाभ घेणेसाठी ते पात्र होऊ शकतात त्या योजना खालील प्रमाणे नोंदित बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांस 1 ली ते 7 वी साठी प्रतिवर्ष् 2500/- व 8 वी ते 10 साठी प्रतिवर्ष रु. 5000/- एवढे शैक्षणिक आर्थिक सहाय्य.नोंदित बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांस 10 वी व 12 मध्ये 50 टक्के वा अधिक गुण प्राप्त झल्यास रु. 10,000/- एवढे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहायय. 11 वी व 12 वी च्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष 10,000/- एवढे शैक्षणिक सहाय्य.नोंदित बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांस वा पत्नीस पदवीच्या प्रथम, व्दितीय व त़तीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके इत्यादी साठी प्रतिवर्षी रु. 20,000/- एवढे शैक्षणिक सहाय्य. तसेच वैदयकीय शिक्षणासाठी प्रतिवर्षी रु. 1,00,000/- व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी रु. 60,000/- एवढे शैक्षणिक सहाय्य. तसेच दोन पाल्यांकरिता शासनमान्य पदवी करिता 20,000/- व पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रतिवर्षी रु. 25,000/- एवढे शैक्षणिक सहायय.दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण (एमएससीआयटी) घेण्यासाठी शुल्क दिल्या जाईल तसेच संगणक शिक्षण झाले असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करुन शुल्क मिळविता येईल. नोंदित बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागु करणे- त्याबरोबरच संपूर्ण कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1,00,000/- रु. एवढे वैदयकीय सहाय्य. नोंदित बांधकाम कामगारास 75 टक्के अपंगत्व किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास रु. 2,00,000/- एवढे अर्थसहायय. नोंदित बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जिवित अपत्यां पर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी 15,000/- रु. ते 20,000/- रु. एवढे आर्थिक सहाय्य. नोंदीत बांधकाम कामगाराने अथवा त्याच्या पत्नीने एका मुलींनतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नांवे 18 वर्षासाठी 1,00,000/- रु. मुदत बंद ठेव. व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचाराकरिता 6,000 रु. एवढे अर्थसहाय्य.नोंदित बांधकाम कामगाराचा कामावर असतांना मृत्यु झाल्यास त्याच्या वारसास 5,00,000/- रु.  व कामगाराचा नैसर्गिक मृत्यु झाल्यास कुटुंबास 2,00,000/- रु. एवढे सहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराचा मृत्यु झाल्यास वारसदारास 10,000/- रु. अंत्यविधी साठी अर्थसहाय्य. नोंदीत बांधकाम कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या पत्नीस अथवा पतीला सलग पाच वर्ष 24,000/- रु. एवढे अर्थसहाय्य.
नोंदित बांधकाम कामगाराला घर खरेदी वा घर बांधणीसाठी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील 6,00,000/- रु. पर्यंत व्याजाची रक्कम अथवा 2,00,000/- रु. एवढे अर्थसहाय्य मंडळामार्फत मिळेल. नोंदित बांधकाम कामगाराला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2,00,000/- एवढे अर्थसहाय्य. नोंदीत बांधकाम कामगाराला स्‍वत: च्या पहिल्या विवाहा करिता 30,000/- रु. एवढे अर्थसहाय्य. दि. 31 ऑगस्ट 2014 रोजी नोंदणी जिवित असलेल्या नोंदीत कामगाराला दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी प्रति कामगार 3000/- रु. एवढे अर्थसहाय्य. नोंदित बांधकाम कामगारांना बांधकामाची उपयुक्त / आवश्यक अवजारे खरेदीसाठी प्रतिकुटुंब 5,000/- एवढे अर्थसहाय्य. याबरोबरच नोंदित बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना लागू करणे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे. नोंदित बांधकाम कामगारांना सुरक्षेसाठी सुरक्षा संच पुरविणे. अत्यावश्यक वस्तू संच पुरविणे. नोंदित बांधकाम कामगारांना पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना लागू करणे.अशा विविध प्रकारच्या नोंदित बांधकाम कामगारांना योजना असल्याची माहिती स्व. नंदाबाई किर्दक बहुउददेशीय संस्था, ब्रम्ही बाई ता. मुर्तिजापुर जि. अकोला चे अध्यक्ष श्री. मिलिंद जामनिक व श्री. चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्याक बहुउददेशीय विकास संस्था, मुर्तिजापुर जि. अकोला चे सचिव श्री. सतिश भाऊराव वानखडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post