बँक स्टेट बॅकेतील होत असलेली ग्राहकांची गैरसोय थांबवा - मनसे


  • बँक व्यवस्थापकास दिलेल्या निवेदनात नमूद केल्या विविध समस्या 

मारेगाव(यवतमाळ ) :- येथील भारतीय स्टेट बैंक मधील बेताल कारभारा मुळे ग्राहकांची गैरसोय होवून ग्राहक त्रस्त झाल्याने रोष व्यक्त करत असल्याची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने घेवून तात्काळ ग्राहक सेवा सुधारण्याच्या व आदी मांगणीचे निवेदन मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांच्या आदेशने शहर अध्यक्ष श्रीकांत सांबजवार यांच्या नेतृत्वात बँक व्यवस्थपकास देण्यात आले.
      यामध्ये शेतकऱ्यांचे पिक कर्जाचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावे,गेल्या अनेक महिन्यापासून खातेदाराना पासबुक एंट्री मिळत नसल्याने तात्काळ पासबुक एंट्री मशीन लावण्यात यावे,आर्थिक देवान-घेवान व्यवहाराला एकच काउंटर असल्याने ग्राहकाना तासन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने पुन्हा एक काउंटर चालू करावे,ATM मशीन मध्ये नियमित रक्कम ठेवावी,नवीन खातेदारना तात्काळ खाते पास बुक देण्यात यावे,काउंटर जवळील स्वाइप मशीन जुन्याच ठिकाणी ठेवण्यात यावी आदी येथील स्टेट बैंक मध्ये कर्मचाऱ्या अभावी ग्राहकांची गैरसोय होत असल्याने तात्काळ येथील ग्राहक सेवा सुधारण्याच्या मांगनी चे निवेदन मनसे च्या वतीने बैंक व्यवस्थपकास देण्यात आले.
    यावेळी मनसे चे मारेगाव शहर अध्यक्ष श्रीकांत सांबजवार यांच्या नेतृत्वात रमेश कोल्हे,लाभेश खाडे,अविनाश लांबट,दुलेश पूरी,सागर नावडे,शुभम सोनुले,आदी महाराष्ट्र सैनिक निवेदन देते वेळी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post