मुर्तिजापुर :- संजय गांधी विभाग, तहसील कार्यालय, मुर्तिजापुर येथे मागील 5 वर्षा पासून 18 वर्षा खालील अपंगा मुला, मुलींच्या पालकांनी संजय गांधी योजने अंतर्गत लाभ मिळण्याकरिता दाखल केलेले अर्ज पडलेले अशी माहिती तौफीकोददीन मतीनोददीन व आदिती वरोकार यांच्या पालकांनी श्री. चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्याक बहुउददेशीय विकास संस्था, मुर्तिजापुर ला दिली. याबाबत संस्थेने संजय गांधी विभाग – नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या बरोबर भेटून चर्चा केली. चर्चे दरम्यान दि. 26 ऑक्टोंबर 2010 रोजीचा शासन निर्णया वर महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या दि. 31 ऑक्टोंबर 2011 रोजीचा विशेष् सहाय्य् योजनेच्या निकषात सुधारणेचा शासन निर्णय वरिष्ठांच्या नजरेत आणून दिला. त्याबाबत संस्था अध्यक्ष भुषण प्रदिपकुमार महाजन, सचिव सतिश वानखडे, मिलिंद जामनिक, प्रमोद वानखडे, ऊर्मिला वानखडे, सुषमा महाजन तसेच संस्था मार्गदर्शक डॉ. अहमद खान रहेमान खान, डॉ. शौकत अली यांनी सतत पाठपुरावा करत मुर्तिजापुर तालुक्यातील 10 अर्जदारांना 18 वर्षा खालील अपंग मुला – मुलींना संजय गांधी योजने अंतर्गत् लाभ मंजूर करण्यास साहायय केले. आमच्या प्रतिनिधीस मिलिंद जामनिक व सतिश वानखडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
श्री. चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्याक बहुउददेशीय विकास संस्था, मुर्तिजापुर च्या पुढाकाराने 18 वर्षा खालील दिव्यांग मुलांना संजय गांधी अनुदान मंजूर