इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील भारत मंदिर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महामंडळ सभेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ लोहारा तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी एल.बी.पडवळ होते.
तर प्रमुख म्हणुन बाळकृष्ण तांबारे,राज्य उपाध्यक्ष अशोक जाधव,भक्तराज दिवान,संतोष देशपांडे,अदि उपस्थित होते.
य या कार्यक्रमात सतिष माळी,प्रविण कदम, राजकूमार वाघडोळे,प्रमाेद शिंदे,सचिन भंडारे,गोविंद जाधव,अदि शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघात प्रवेश केला.व लोहारा तालुक्यात बदलीने आलेले शिक्षक व विशेष प्राविण्य प्राप्त केलेले शिक्षक के.एस.गायकवाड,अमोल गेडेवाड,प्रमोद माने, दत्तात्रय पांचाळ, राजकूमार क्षीरसागर,मोरवे खजिर, यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यामध्ये अध्यक्ष — सुदर्शन जावळे,सरचिटणीस — राहुल ओवांडकर,उपाध्यष — सुभाष नागणे,सचिन मक्तेदार,मेघराज कदम,कोषाध्यक्ष — रफिक शेख, सह कोषाध्यक्ष — पंडित राठोड,कार्याध्यक्ष — नितीन वाघमारे,सह कार्याध्यक्ष — राजपुत्र पाटील,प्रसिध्दी प्रमुख — राजेंद्र माळवदकर,बोकडे मच्छिंद्र,तालुका संघटक — दिपक पोतदार,विजयकुमार बुकन,जाफर मुल्ला,तालुका नेते — संजय माशाळकर,प्रविण साळुंके,कोडिंबा कारभारी,तालुका प्रवक्ता — बाबा साहेब कदम,तालुका संपर्क प्रमुख — सतिश माळी, झहिरोद्दीन शेख यांची निवड करण्यात आली.
तालुका म़हिला शिक्षक संघ कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्षा — सौ.वर्षा कमलाकर चौधरी, सरचिटणीस — सौ.निर्मला धोडिंबा दंतकाळे, उपाध्यक्षा — वर्षा शेटकार,अर्चना साखरे,इंदूमती जगताप,कार्याध्यक्ष — सौ.नागिनी शिंदे,कोषाध्यक्ष — उलन कांबळे,तालुका संघटक — वर्षाराणी माने, आसिफा सय्यद,संपर्क प्रमुख — सौ.सोनाली जगताप, सौ.जनाबाई कंदले यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास शहरातील व तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
