शिक्षण क्षेत्राबरोबरच प्रत्येक क्षेत्रात सध्याच्या काळात संगणकीय ज्ञान अंतिमहत्वाच झाल आहे.त्यामुळे लहान वयातील विद्यार्थ्यांना याची खूप गरज आहे.तर तरुणांसाठी याचा अतिवापर धोक्याचा बनत चालला आहे तेव्हा तरुण पिढीने याचा गैरवापर आणि अतिवापर टाळावा — पो.नि.माधवराव गुंडीले


इकबाल मुल्ला
लोहारा/उमरगा प्रतिनिधी :- शिक्षण क्षेत्राबरोबरच प्रत्येक क्षेत्रात सध्याच्या काळात संगणकीय ज्ञान अंतिमहत्वाच झाल आहे त्यामुळे लहान वयातील विद्यार्थ्यांना याची खूप गरज आहे तर तरुणांसाठी याचा अतिवापर धोक्याचा बनत चालला आहे तेव्हा तरुण पिढीने याचा गैरवापर आणि अतिवापर टाळावा,असे प्रतिपादन पो.नि.माधवराव गुंडीले यांनी केले.
 उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.19 ऑगस्ट  रोजी संगणक कक्षाचे उदघाटन करुन पो.नि.माधवराव गुंडीले बोलत होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य शेखर घंटे होते.तर प्रमुख म्हणुन पोलीस उपनिरीक्षक कु.अनिता इटूबोने,पोलीस उपनिरीक्षक समाधान कवडे,माजी मुख्याध्यापक नारायण गरुड, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष राम पाटील,व्यंकट लादे,गोविंद भाऊ पवार, उपसरपंच शिवाजी पवार, केशव दाजी पवार,सिद्धेश्वर माने,डॉ.संतोष सनातन, गोविंद माधव पवार,संजय कांबळे,गोमारे सर,आदी उपस्थित होते.यावेळी जि.प.प्रा.शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक संजय पवार व सूत्रसंचालन हरिदास बाबळसुरे यांनी केले तर आभार भागवत कुंभार यांनी मानले.या कार्यक्रमास शिक्षक,विद्यार्थी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post