जितेश कारीया
हिवरखेड :- लोकजागर सोबत शेतकरी बारामतीच्या वारीला लोकजागर मंचचे संस्थापक अनिलभाऊ गावंडे यांच्या कल्पनेतून व पुढाकाराने तसेच पुरुषोत्तम आवारे,ऍड. सुधाकर खुमकर, गजानन बोरोकर,गोपाल जळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आकोट व तेल्हारा तालुक्यातील 80 शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी बारामतीला रवाना झाले.
हे शेतकरी त्या परिसरातील पिकं, पीकपद्धती, आधुनिक नवीन तंत्रज्ञान इ.गोष्टी जाणून घेणार आहेत शिवाय उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्याचे उत्पन्न कसे वाढेल,पाण्याचे नियोजन कसे करावे,फळबागांची लागवड व जोपासना कशी करावी इ.विषयी या शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
आपल्या आकोट व तेल्हारा परिसरात कसदार जमीन व मुबलक पाणी असूनसुद्धा आपल्याकडील शेतकरी कर्जबाजारीच आहे,त्याची प्रगती थांबली आहे आणि हळूहळू तो आत्महत्येकडे वळतो आहे त्या शेतकऱ्याला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठीच हा शेतकरी दौरा आयोजित केल्याची प्रतिक्रीया लोकजागर मंचचे संस्थापक अनिलभाऊ गावंडे यांनी व्यक्त केली.
या दौऱ्यावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना सोनवाडी फाटा हिवरखेड येथे शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी लोकजागर मंच हिवरखेडचे अध्यक्ष महेंद्र कराळे, उपाध्यक्ष सुरेश ओंकारे,प्रसिद्धी प्रमुख अर्जुन खिरोडकार यांच्या सोबत प्रवीण गावंडे,गौरव गावंडे,रमेश व्यवहारे, अभिजित ढोकणे, वृषभ कोल्हे,नरेंद्र राऊत, दिलीप बाळापुरे इ.ची उपस्थिती होती.
