लोहारा शहरातील महेबुब मोमीन यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले


 इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील महेबुब बिस्मिल्लाह मोमिन याने दुसऱ्या आंतराष्ट्रीय पुपिल्स ऑलम्पिक स्पर्धेत चौदा वर्षे वयो गटात सुवर्ण पदक मिळविले.
कर्नाटक राज्यातील सिमोगा येथील नेहरू स्टेडियम मध्ये हि स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत भारत,अमेर भारत,अमेरिका,मलेशिया,श्रीलंका,नेपाळ,मलेशिया,
श्रीलंका,नेपाळ,अदि देशातील खेळाडूनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत मोमीन महेबुब बिस्मिल्लाह याने चमकदार कामगिरी केली.यावेळी पुपिल्स
 ऑलम्पिक असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.महेश मोटे, जनरल सेक्रेटरी महमदरफी शेख यांच्या हस्ते सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या विद्यार्थ्याला महमदरफि शेख,राहुल अंबुरे,यांचे
मार्गदर्शन लाभले.या यशाबध्दल लोहारा शहरात ग्रामस्थांच्यावतीने महेबुब मोमीन यांचा लोहारा शहरात यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष अमिन सुंबेकर,नगरसेवक आरीफ खाणापुरे,
बिस्मिल्लाह मोमीन,आदमशाह फकीर,अदि उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post