राधे माँ आता वेबसीरिजमध्ये चमकणार


मुंबई :- स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ हिनं अध्यात्माच्या मार्गावर चालता चालता अभिनयाकडं मोर्चा वळवला आहे. 'राह दे माँ' या वेबसीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिनं स्वत:च मालिकेची निर्मिती केली असून नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर लाँच झाला आहे.

ही वेबसीरिज अध्यात्मिक असेल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, राधे माँनं हा अंदाज खोटा ठरवला आहे. या वेबसीरिजमधून समलैंगिकतेच्या मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. ट्रेलरची सुरुवातच एका बोल्ड दृष्यानं होते. राधे माँच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचं चित्रण या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राधे माँचे मॉर्डन लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो वेबसीरिजच्या ट्रेलर लाँचिग कार्यक्रमातील असल्याचं आता उघड झालंय. राधे माँचा हा नवा अवतार लोकांना किती भावतो, हे पाहावं लागणार आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post