विस आमदार व तीन खासदारांसह राज्यातील 500 प्रमुख व्यक्तीच्या उपस्थीतीत उस्मानाबादेत होणार मुस्लिम आरक्षण परिषद



  • मुस्लिम आरक्षण समितीच्या पदाधिकार्यांनी दिली पत्रकार परिषदेत माहीती

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद येथील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यग्रहात दि.1 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय एक दिवशीय मुस्लिम आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेसाठी तीन खासदार व विस आमदार यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व पक्षीय लोकप्रतिधींची उपस्थीती राहणार आसून 500 प्रमुख व्यक्ती या परिषदेसाठी उपस्थीत राहणार आहेत.यात विवीध संघटनांनी पाठिंबा दिला आसल्याची माहीती दि.29 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत जाहिर करण्यात आले आहे.या परिषदेची सुरवात सकाळी साडे दहा वाजता करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे आध्यक्ष खासदार हुसैन दलवाई,नवाब मालिक हे आसणार आहेत.तर स्वागताध्यक्ष कळंब उस्मानाबाद चे आमदार राणाजगजीतसींह पाटिल हे राहणार आहेत.खा.माजीद मेमन,खा.प्रा.रविंद्र गायकवाड,आ.आरेफ नसीम खान,आ.बाबाजानी दुर्राणी,आ.इम्तियाज जलिल,आ.आसलम शेख,आ. मौलाना नदीम,आ.अबु आसिम आजमी,आ.हसन मुश्रीफ,आ.अब्दुल सत्तार,आ.वारीस पठाण,आ. खाँजा बेग,आ.डाँ.वजाहत मिर्जा,आ.आमीन पटेल, आ.एम.एम.शेख,आ.मधुकरराव चव्हाण,आ.
सुजीतसिंह ठाकूर,आ.सुरेश धस,आ.राहुल मोटे,आ. ज्ञानराज चौघुले,आ.विक्रम काळे,आ.सतीश चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटिल,नगर आध्यक्ष माकरंद राजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थीतीत या एक दिवशीय राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षणबाबत परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेमध्ये मुस्लिम आरक्षणबाबत पुढील दिशा व ध्येयधोरण ठरवण्यात येणार आसल्याची माहीती पत्रकार परिषदेत मुस्लिम आरक्षण समितीच्या वतीने  जाहिर करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post