आदिवासी संशोधन केंद्र पुणे, यांची तोडफोड, तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची विटंबना व संविधान जाळल्या प्रकरणी वरील सर्व घटनेतील गुडांना कठोर शिक्षा व्हावी ,यासाठी दिनांक, २७.८.२०१८ सोमवार ला तेल्हारा येथे "शिवराणा ग्रुप"


तेल्हारा :- तेल्हारा तालुका च्या वतीने तेल्हारा तहसिलदार यांना निवेदन देवुन या घटनेचा जाहीर निषेध केला व या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली तसेच या गुन्हेगारांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.ह्यावेळी तेल्हारा नगर परिषद शिक्षण सभापती मंगेश भाऊ सोळंके,रवी मालवे,अरुण चव्हाण,प्रमोद चव्हाण,निलेश पवार,योगेश डाबेराव,यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post