बाळापूर :- अकोला जिल्हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो वामनदादा कर्डक यांच्या नावाने स्थापन झालेल्या महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्थेने आंबेडकरी चळवळीचा सांस्कृतिक वारसा जपला असल्याचे प्रतिपादन भारिप बमसच्या नेत्या प्रा. डॉ. अंजलीताई आंबेडकर यांनी केले. त्या महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्था, बाळापूर जि. अकोला आयोजित " वामनदादा कार्डक जयंती महोत्सव २०१८ आणि पुरस्कार वितरण सोहळा" (वर्ष ५ वे) या कार्यक्रमातून बोलत होत्या. संस्थेच्या वतीने शहरात पहिल्यांदाच वामनदादा कर्डक जयंती व्यापक स्वरूपात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आंबेडकरी इतिहासकार प्रा प्रकाश जंजाळ हे होते तर विचारमंचावर श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर, आमदार बळीराम सिरस्कार, जि प अध्यक्ष संध्याताई वाघोडे, भारिप महिला आघाडीच्या प्रदेश संघटक अरुंद्धतीताई सिरसाट, जि प सभापती रेखा अंभोरे, जि प सदस्य साम्राटभाऊ डोंगरादिवे, भारतीय बौद्ध महासभेचे भीमरावजी तायडे, पं स सभापती मंगलाताई तितुर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई सिरसाट, भारीपचे ज्येष्ठ नेते शामलालजी लोध, ज्येष्ठ साहित्यिक आ कि सोनोने, ज्येष्ठ गायक विजयकुमार गवई, माजी जि प अध्यक्ष बालमुकुंद भिरड, रमाई मासिकाच्या संपादक प्रा रेखा मेश्राम, ग्रंथालय महासंघाचे अध्यक्ष शामरावजी वाहूरवाघ, शहर अध्यक्ष नितीन उमाळे, प्रा सदानंद माळी, उमेश इंगळे, पत्रकार उत्तमराव दाभाडे, सिद्धार्थ वानखडे, सम्यकचे विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक, बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रवीण विरघट, अमरावती जिल्हाध्यक्ष अंकुश वाकपांजर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अकोला जिल्ह्यातील तमाम आंबेकरी गायक तथा गीतकार यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये नागसेनदादा सावदेकर, शाहीर देवा अंभोरे, प्रा किशोर वाघ, सुखलाल इंगळे आणि जिल्ह्यातील गायकांची उपस्थिती होती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अमरदीप वानखडे यांनी केले. त्यानंतर मान्यवारांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये जागतिक पातळीवरील फुले-आंबेडकर अभ्यासक डॉ गेल ओमवेट आणि प्रसिद्ध आंबेडकरी गायक तथा गीतकार अनिरुद्ध वनकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबरोबरच महाराष्ट्रातील विविध पातळ्यांवर कार्य करणा-या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये एड संतोष रहाटे, रामदास वानखडे, रातांकुमार साळवे, डॉ आशिष गि-हे, माया गेडाम, पराग गवई, शाहीर संभाजी सिरसाट, डॉ किशोर वाघ, डॉ सुरेश गवई, मनोहर तायडे, अरुण सावंग, सुरेंद्र घरडे आदींचा समावेश आहे. यसह महिला आघाडीच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रभाताई सिरसाट यांचाही गौरव करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. गेल ओमवेट यांनी संयोजन समीतीचे आभार व्यक्त केले. अनिरुद्ध वनकर बोलतांना म्हणाले की, अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते वामनदादा कर्डक जीवनगौरव पुरस्कार मिळणे हि बाब महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळण्यापेक्ष माझ्यासाठी मोठी आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आदेश आटोटे यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव अमोल सिरसाट यांनी मानले. यावेळी बाळापूर तालुक्यातील महिला संघांनी विशेष उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या अखेरीस अनिरुद्ध वनकर यांचे 'द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता' हे नाटक संपन्न झाले. चळवलिच्या कार्यकर्त्याची कशी अवस्था होत आहे याचे वास्तवदर्शन या नाटकातून पाहायला मिळाले. सुनियोजन केलेला हा ऐतिहासिक सोहळा पहिल्यांदा बाळापूर शहरात घडला असल्याची एकच चर्चा शहरात सुरु आहे. अत्यंत शिस्तबद्ध संपन्न झालेल्या या सोहळ्याचे आयोजन अमरदीप वानखडे, एड. प्रशांत उमाळे, सूरज सोनोने, सुशील वाकोडे, रवी थेटे, विकास अवचार, योगेश किर्तक, पंकज तिडके आदींनी केले होते.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील आंबेडकरी गायक, गीतकार, साहित्यिक, कवी यांच्यासह तमाम आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.


