- शिरपूर येथे मनसे शाखेची स्थापना, शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश
वणी: युवकांना उद्योग आणि नोकऱ्यांचे मोठमोठे दिवा स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने युवकांना ना कोणत्या नोकऱ्या ना कोणता उद्योगधंदा उभारून रोजगार दिला, युवकांच्या तोंडाना पाने पुसण्याचे काम या सरकारने केले आहे व तसेच आज जातीपातीच्या राजकारणात विद्यार्थ्यांना अडकून त्याची दिशाभूल करत असल्याचा घणाघाती आरोप मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी केला.
शिरपूर येथील मनसे शाखा फलक अनावरण प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की सरकारच्या फसव्या आश्वासनामुळे युवक पुरताच हतबल झाला असून या युवकांना योग्य तो न्याय फक्त मनसेच मिळवून देऊ शकतो त्यामुळे युवकांनी मान. राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माणाच्या लढ्यात सामील व्हावे असे आव्हान त्यांनी केले. यावेळी असंख्य युवकांनी मनसेत प्रवेश घेऊन नवनिर्माणाचा झेंडा हाती घेतला.
यावेळी मनसेचे यावेळी मनसेचे तिरुपती कंदकुरीवार, तालुका अध्यक्ष उमेश वैरागडे,धनंजय त्रिंबके,आजिद शेख,लक्की सोमकुंवर, इरफान सिद्धकी,राजु बोधाडकर,विनोद कुचनकर, राजु लांडे, आकाश खामनकर, चांद बहादे,जयश बुच्चे, धम्मादीप शंभरकर,निलेश हुडेकर, गौरव पिरतकर, आदी पदाधिकारी तर मोरेश्वर नानकटे, जगदीश बोरपे, आकाश टेकाम यांच्या सह गावातील सर्व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष वैरागडे यांनी शिरपूर शाखेची कार्यकारणी घोषित करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...


