यवतमाळ :- लोकप्रिय राष्ट्रसंत प.पू. द्वितीय आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी म.सा. यांची 119 वी जन्म जयंती कळंब येथील जैन स्थानकामध्ये छत्तीसगड प्रवर्तक महाश्रवण लोकमान्य संत पुज्यनिय गुरुदेव रतनमुनीजी म.सा., तपस्वी उपप्रवर्तक डॉ.सतिशमुनीजी म.सा. आदीठाणा पाच यांच्या निश्रेयद्वितीय आचार्य सम्राट आनंद ऋषीजी म.सा. यांची जयंती साजरी करण्यात आली.
कळंब जैन श्री संघ च्या वतीने 210 समाज बांधवांनी सामुहिक एकासना तसेच सामाजिक स्वाध्याय करुन जयंती उत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी नवकार मंत्र उच्चारणे कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी प.पु. श्री शुक्ल मुनीजी म.सा. यांनी आचार्य भगवंतांच्या जीवन चरीत्रावर आधारीत गीत प्रस्तुत केले. उपप्रवर्तक सतिश मुनीजी म.सा. यांनी आपल्या प्रवचनातून म्हटले की आचार्यांचे पद हे गुरुंचे पद असते. जे ज्ञान, गुण व नेतृत्व तसेच शारीरिक, मानसिक संपदाने परिपुर्ण असते ते आचार्य होतात. गुरुंचे जीवन आत्मउत्कर्षाची प्रेरणा देतात. आकाश हे अंधाराला सात प्रकाशाकडे घेवून जाते. आचार्य भगवंतांची प्रेरणा मला मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी छत्तीसगड प्रवर्तक प.पू.गुरुदेव रतनमुनीजी म.सा. यांनी दिर्घ मंगलीकचे सुद्धा वाचन केले. याप्रसंगी छत्तीसगड दुर्ग, राजनगाव, कवर्धा, वर्धा, हिंगणघाट, पोहणा, नागपूर, चांदूररेल्वे आदी भागातून मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते.
कळंब येथील या ऐतिहासिक चार्तुमासानिमित्त गुरुदेव प.पु.रतनमुनीजी म.सा. यांच्या दर्शनार्थ संपूर्ण विदर्भातील जैन बांधव येवून लाभ घेत आहे. नियमितपणे प्रवचन, प्रार्थना, मंगलीक पाठ, सामायिक स्वाध्याय, धर्मचर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
