- सत्कार समारंभ व काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन
यवतमाळ : देशातल्या व राज्यातल्या विद्यमान शासनाने सातत्याने जनतेची दिशाभूल करण्याचेच काम सत्तेवर आलेल्या दिवसापासून केले असून आता नवा इतिहास रचित फसवणुकीचा कळस गाठल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले ते यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बळवंत मंगल कार्यालयात सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्षीय भाषणातून म्हणाले ते पुढे म्हणाले की आगामी काळात लवकरच निवडणुका होणार असून त्यासाठी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहवे व आ वजाहतजी मिर्झा यांच्या विधान परिषदेवरील निवडीने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्याला बळ मिळाले आहे.
सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त विधान परिषद आमदार डॉ वजाहत मिर्झा म्हणाले की एक माझी आमदारकी म्हणजे जन सामान्य कार्यकर्त्याला मिळालेली पावती होय, मी अश्याच काँग्रेस मेळाव्यात मागे बसून राहायचो व प्रामाणिकपणे पक्षाचे काम करीत राहायचो हे सांगतांना त्यांनी सर्व ब्लॉक अध्यक्षाना बल देण्याचे मान्य करीत आपण आपल्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्षांना प्रत्येकी पाच लक्ष रुपये पर्यंत 30 ऑगस्ट पर्यंत कुठलेही विकास कामे सुचवावी मी त्यास तात्काळ मान्यता देण्याचे जाहीर केले.
दुसऱ्या सत्कार मूर्ती अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटी च्या सचिव सौ संध्याताई सव्वालाखे यांनी राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांचे आभार मानीत महिलांना काँग्रेस पक्षात मनाचे स्थान व नवी संधी मिळणार असून पक्षाचे ध्येय व धोरणे त्यासाठी अनुकूल असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन अरविंद वाढोनकार, प्रस्थाविक अशोक बोबडे तर आभार चंद्रशेखर चौधरी यांनी मानले
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आ वामनराव कासावार, प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस श्याम उमाळकर माजी आ विजयराव खडसे, जी प अध्यक्ष मधुरीताई आडे, माजी आ कीर्ती बाबू गांधी, बाळासाहेब मांगुलकर, बाबासाहेब गाडे, नितीन जाधव, जीवन पाटील, अरुणा ताई खंडाळकर, तातू देशमुख, राहुल ठाकरे, अरुण राऊत, दिनेश गोगरकर, अनिल गायकवाड, किशोर भवरे, कृष्णा कडू, सिकंदर शहा, किरण कुमरे, जाफर खान, मनीष पाटील, सुनील भेले, कृष्णा पुसनाके, यांचे सह विविध आघाड्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व विविध लोकप्रतिनिधी तथा काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

