ट्री गार्ड लावून वृक्षारोपण



  • संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीचा उपक्रम 

जितेश कारीया
हिवरखेड :-  येथील संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीच्या वतीने दि29 जुलै रोजी होली फेथ कॉन्व्हेंट व नागनाथ नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले व 15 वृक्षांना ट्री गार्ड लावण्यात आले .हे ट्री गार्ड श्री विजय श्रीमं बाठे(झाडेगाव)यांच्याकडून देण्यात आले.या प्रसंगी होली फेथ कॉन्व्हेंट येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वासुदेवराव निंबोकार होते तर प्रमुख अतिथी म्हणून संदीप इंगळे,जगन्नाथ महाकाळ, रामेश्वर शिंगणे, ग्रा.प.सदस्य बजरंग तिडके,सुनील इंगळे,संतोष गावंडे ,प्रा.अस्वार मॅडम उपस्थित होते.
याप्रसंगी महेंद्र कराळे ,उमेश तिडके यांनी वृक्ष व पर्यावरणाचा सहसम्बध स्पष्ट करून सांगितला तर राजेश टाले व दिलीप बाळापुरे यांनी समितीच्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती दिली.यावेळी पत्रकार गोवर्धन गावंडे,सुरज चोबे,चिंतामण नेरकर यांच्यासह उमेश टापरे,अरुण राहाणे, रमेश व्यवहारे, उमेश कोल्हे,अजय नवले,राजाराम इंगळे,मंगेश मोरोकार, अक्षय मोरखडे,पंकज देशमुख,जयंत शेंगोकर, विनायक वाकोडे,वैभव गावंडे, निसर्गप्रेमी धनंजय गावंडे, रवी घुंगड इ.ची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे संचालन विलास घुंगड तर आभार प्रदर्शन मनिष गोरद यांनी केल्याचे महेंद्र कराळे यांनी कळविले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post