मुर्तिजापुर – सांजापूर ग्रामपंचायत येथे श्री. चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्याक बहुउददेशीय विकास संस्था, मुर्तिजापुर जि. अकोला व स्व. नंदाबाई किर्दक बहुउददेशीय संस्था, ब्रम्ही बाई ता. मुर्तिजापुर जि. अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उदबोधन तसेच महिलांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम दिनांक 28.07.2018 शनिवार रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय, सांजापूर येथे घेण्यात आला. या दरम्यान महिलांना सर्वप्रथम अकोला पोलीस प्रसाशसनाच्या मार्फत चालू असलेल्या जननी – 2 च्या अंतर्गत येत असलेल्या कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005, ज्येष्ठ नागरिकांना करिता कायदा, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012, प्रसतीपूर्व लिंग निदान प्रतिबंध कायदा 1994, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट् व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013, मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अशा सर्व कायदयांची माहिती देवून त्याबाबतच्या पुस्तिकांचे व माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र शासना मार्फत राबविण्यात येणारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सध्यास्थितीत महात्मा ज्योतीबा फुले जन सेवा आरोग्य योजना असे परावर्तीत झालेल्या योजने बाबत व त्या आरोग्य योजनेचे ओळखपत्रा बाबत व ओळखपत्र कसे मिळविता येईल. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याबरोबरच महिला बचत गटां करिता असलेल्या शासनाच्या विविध योजना, बांधकाम कामगारांना करिता विशेष नोंदणी अभियान व नोंदणी केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विविध योजनां बाबत माहिती देवून मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमा करिता सौ. छाया दहीकर, सौ. पंचफुला तायडे, सौ. अरुणा ठानेकर, सौ. अंजली देशमुख, सौ. रेखा तिरकर, सौ. मंगला सोळंके, सौ. सुनिता पोटे, सौ. ज्योती सावरकर, सौ. भारती उंबरकर, सौ. अनुराधा येळणे,
श्रीमती संगिता डांगे, सौ. वेणूताई डाबेराव, सौ. स्मिता डांगे, सौ. उषा मुळे, सौ. बबिता भगत, सौ. रेखा चारोळे, श्रीमती कामिनी तायडे, सौ. जिजा मुळे, सौ. योगिता मुंडे, सौ. अनिता पराप, सौ. नंदा चव्हाण, सौ. प्रतिभा मुरुमकार, सौ. चंदाबाई थोप, सौ. कोमल रामचोरे, सौ. ज्योती सरदार, श्रीमती शोभा डांगे, सौ. रमा डांगे, सौ. माधुरी अंभोरे, सौ. सपना गोबरे, सौ. अनिता चिंचे, सौ. शालु सरदार, सौ. पदमा वानखडे, सौ. रेखा धुमाळे, सौ. वनमाला, सौ. बेबी मालवे, सौ. सेहल सोळंके, सौ. वैशाली राठोड, सौ. शोभा डाबेराव, सौ. कौशल्या श्रीवास, सौ. शिला फुलजेले, सौ. शालु डांगे, सौ. चंद्रकला येळणे हया बचत गटातील महिला व इतर महिला अशा जवळपास 60 ते 70 महिला उपस्थित होत्या. त्याबरोबरच सांजापूर सरपंच सौ. कोकिळाताई कैलास मालवे, उपसरपंच सौ. माधुरीताई सुमेध अंभारे, पंचायत समिती सदस्य श्रीमती अंजलीताई सुनिल देशमुख, श्री. चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्याक बहुउददेशीय विकास संस्था, मुर्तिजापुर जि. अकोला चे संस्था अध्यक्ष श्री. भुषण प्रदिपकुमार महाजन, संस्था सचिव – श्री. सतिश वानखडे, स्व नंदाबाई किर्दक बहुउददेशीय संस्था, ब्रम्ही बाई ता. मुर्तिजापुर जि. अकोला चे संस्था अध्यक्ष श्री. मिलिंद अर्जुनराव जामनिक व इतर माननीय ग्रामस्थ्ा हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मिलिंद जामनिक यांनी केले. जननी – 2 ची माहिती श्री. सतिश वानखडे यांनी दिली. आरोग आरोग्य योजनेची माहिती श्री. भुषण महाजन यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता श्री. कैलास अजाबराव मालवे – समाजसवेक, श्री. गणेश धुमाळे, श्री. रामराव डाबेराव, श्री. नारायण डांगे, श्री. फुलसिंग राठोड, श्री. विलास जोगी व इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले.