हिवरखेड़ च्या गाडीचा सातपुड्यात अपघात




  • दोन झाडांनी टाळली महाबळेश्वर घटनेची पुनरावृत्ती


जितेश कारीया
हिवरखेड़ :- सहली करिता हिवरखेड येथील तीन कुटुंब क्रुझर क्रमांक एम एच 27 AC 1215  ह्या गाडिने चिखलदऱ्याला जात असताना सातपुड्याच्या घाटात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. गाडीचे एक्सल तुटल्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन खाली खाली फरफटत गेली आणि धड़क इतकी जबर बसली की त्यामध्ये एक तिस ते पस्तीस फुटाचे झाड पूर्णतः उद्ध्वस्त झाले तर दुसऱ्या झाडाला जाऊन गाडी अडकली जर त्या ठिकाणी ही दोन झाडे नसती तर आज महाबळेश्वरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली असती असे प्रवाशी प्रशांत मोगरे यांनी आपबीती कथन करताना सांगितले.
सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी सात प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांना जास्त मार लागलेला आहे.
या घटनेत ऐकुन सात प्रवासी जखमी झाले असून त्यांची नावे गोविंदराव मोगरे, कुसुमबाई मोगरे, वैशाली धरमकर, प्रतीक्षा धरमकर, मंगला प्रशांत मोगरे पियुष कामेश राठोड, रविंद्र मनोहर कराळे अशी आहेत.

जवळपास कोणतेही गांव नसल्याने डाट जंगलात सुनसान भयावह वातावरणात मदतीसाठी वाट बघत असताना त्यातीलच कामेश राठौड़ आणि मुन्ना डांडगे या युवकांनी हिम्मत करून जवळपास 7 किलोमीटर पायी जात आदिवासी ग्राम गाठले आणि तेथील काही युवकांना ट्रैक्टर घेवून मदतीसाठी आणले तसेच तेथून हिवरखेड़ येथील गजानन भटकर आणि पुरुषोत्तम रेखाते यांना दूसरी गाडी घेवून घटनास्थळावर बोलविले.
घटनास्थळ एकांतात असल्याने
सर्व प्रक्रियेला बराच कालावधी लागल्याने जखमी व्यक्तिंना उपचारास अकोट येथे नेण्यास बराच वेळ लागला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post