अतुल नवघरे
लाखपुरी :- पंचायत समिती मूर्तिजापूर मध्ये शिक्षकांच्या पॅन खात्यात मागील वर्षाचा व चालू वर्षाचा आयकर टिडिएस जमा न झाल्यामुळे शिक्षकांना आर्थिक भुर्दंड व आयकर विभागाची नोटीसचा सामना करावा लागत आहे दरवर्षी शिक्षक चारशे रुपये प्रति शिक्षकाप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातच शिक्षण विभागात आयकर करिता पैसे जमा करतात.यामध्ये शिक्षकांचे सोळा नंबर चे फॉर्म व आयकर रिटर्न फॉर्म भरणे अपेक्षित आहे परंतु मनमानी कारभारामुळे चारशे रुपये फक्त सोळा नंबर चे फॉर्म शिक्षकांच्या माथी मारले जातात.प्रत्यक्ष संबंधीत वकिलार्शा संपर्क साधला असता,त्याला चार क्वार्टरची फी 100रु.प्रति शिक्षक दिल्या जाते.मग उर्वरीत 300रुपयांचे काय? हा प्रश्नही निर्माण होतो.ऐवढे होऊन सुद्धा शिक्षकांच्या खात्यात टिडिएस जमा होत नाही,नियमाप्रमाणे 31मे पर्यंत आयकर विभागाकडे टिडिएस जमा होने अपेक्षित आहे. त्यातही टिडीस जमा न झाल्यामुळे शिक्षकांना आयकर विभागाच्या नोटिसा प्राप्त झाल्या. मागील वर्षीचा टिडिएस अद्याप पर्यंत खात्यात जमा झाला नाही त्यामुळे बऱ्याच शिक्षकांना आयकर विभागामार्फत दंड ठोठावला आहे.वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करित आहे.
मंगळवारपर्यंत खात्यात टिडिएस जमा झाला नाही तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथ.वि),मुर्तिजापूर मार्फत आंदोलन करण्यात येईल.
