उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कै़.अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्काराचे पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते बुधवारी वितरण


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मराठवाडा स्तरीय कै़.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण राज्याचे दुग्ध विकास, यपशुसंवर्धन व वस्त्रोउद्योग राज्यमंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना़.अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे़.पुरस्काराचे यंदा रौप्य महोत्सवी 25 वे वर्षे आहे़ उस्मानाबाद येथे दि.25 जुलै 2018 रोजी सायं 4 वा़जता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न होणार आहे़.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी परिवहन मंत्री आ़.मधुकरराव चव्हाण हे राहणार आहेत़.तर प्रमुख म्हणुन खा.प्रा़.रविंद्र गायकवाड,आ़. राणाजगजितसिंह पाटील,आ़.राहुल मोटे,आ़.ज्ञानराज चौगुले,आ़.सुजितसिंह ठाकूर,आ़.तानाजी सावंत,आ़. विक्रम काळे,आ़.सुरेश धस,आ़.सतीश चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,उस्मानाबाद नगरपरिषदचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,
 उपस्थित राहणार आहे़त उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठवाड्यातील पत्रकारांना सलग 24 वर्षापासून कै़.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे़. यंदा पुरस्कार वितरणाचे रौप्य महोत्सवी 25 वे वर्षे आहे़.या सोहळ्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कामाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी आऱ.व्ही़.गमे,उस्मानाबाद जिल्हा पाणंदमुक्त केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते व जिल्हा पोलीस प्रशासन आएसओ मानांकित केल्याबद्दल पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा पत्रकार संघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे़.तसेच पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल ना़.अर्जुन खोतकर,उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजुर केल्याबद्दल आ़.सुजितसिंह ठाकूर व काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती झाल्याबद्दल आ़. बसवराज पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे़. पत्रकारिता पुरस्कार (विशेष वार्ता गट ) माधव आटकोरे(जि़.नांदेड),रमेश अर्जुन कदम (जि़.हिंगोली), दिपक लिंबराज बारकुल(जि़.उस्मानाबाद),व डॉ़.रविंद्र भताने (जि़.लातूर),तर शोध वार्ता गटामध्ये बालाजी पांडुरंग वडजे (जि़.उस्मानाबाद),अमोल भास्कर मुळे (जि़.बीड),मुल्ला रोशन अब्दुल खादर(जि़.लातूर) व राजहंस तुकाराम कांबळे (जि़.लातूर) यांना जाहीर झालेला आहे़.पत्रकारिता पुरस्कारामध्ये रोख रक्कम, स्मृती चिन्ह,प्रमाणपत्र,फेटा,शाल व पुष्पहार असे स्वरुप आहे़.या कार्यक्रमास मराठवाड्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस संतोष जाधव,प्रदेश सदस्य मोतीचंद बेदमुथा,कोषाध्यक्ष संतोष हंबीरे,सहसचिव राजाभाऊ वैद्य,उपाध्यक्ष श्रीकांत कदम,अब्बास सय्यद, तालुकाध्यक्ष सुभाष कदम(उस्मानाबाद),अंबादास पोफळे(तुळजापूर),बालाजी वडजे(उमरगा),विलास मुळीक(कळंब),सुरेश घाडगे(परंडा),प्रमोद कांबळे (भूम),गौतम चेडे(वाशी),इक्बाल मुल्ला(लोहारा), संघटक प्रशांत कावरे,मल्लीकार्जुन सोनवणे,विनोद बाकले,धनंजय पाडूळे,आकाश नरुटे,कैलास चौधरी, पार्श्वनाथ बाळापुरे,राहुल कोरे,अमजद सय्यद,मच्छिंद्र कदम,संतोष शेटे,बुबासाहेब डोंगरे यांनी केले आहे़.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post