- सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले निवेदन
विलास नसले
मूर्तिज़ापुर :- संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला अनुसरून येथील सकल मराठा समाजाने सकाळी दहा वाजता संपूर्ण शहरातून फेरी काढून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशा घोषणा देत येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.यामध्ये महिलांचा देखील समावेश होता.
या निवेदनामध्ये औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्याचा प्रकार खेदजनक असून शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे आता तरी गांभीर्याने लक्ष घालावे अशा स्वरूपाचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले.
आज पुकारण्यात आलेल्या बंदला मुर्तीजापुर शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. येथील व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.बंद मधून शाळा, महाविद्यालय, दवाखाने,औषधी दुकाने यांना वगळण्यात आले होते.
शहरातून सकल मराठा समाज बांधवांनी काढलेल्या फेरी दरम्यान शिस्तबद्धता दिसून आली. यावेळी पोलिस बंदोबस्त चोख होता. शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आव्हाळे, पोलीस कॉन्स्टेबल हंबर्डे, पोलीस कॉन्स्टेबल मगर यासह इतर पोलिसांचा सहभाग होता.
उपविभागीय अधिकारी सैंंदाने यांना सात लोकांचे शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.त्या नंतर शिवाजी महाराज चौक येथे काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.



