सह्याद्रि फाउंडेशनच्यावतीने 10 वी व 12 वी मधील विद्यार्थ्याचा सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सह्याद्री फाउंडेशन्स उस्मानाबाद व अंजुमन हेल्थ केअर वेलफेअर उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने, शम्स एज्युकेशन सोसायटी संचलित शम्सुल उलुम उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे 10 वी व 12 वी. मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संचालिका व राष्ट्रपती पदक विजेत्या डाँ.सय्यद तबस्सुम सुल्ताना होत्या.
यावेळी प्रमुख म्हणुन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डाँ.दापके-देशमुख दिग्गज,स्त्री रोग तज्ञ डाँ.दापके-देशमुख वसुधा,नगरसेवक इस्माईल बाबा शेख,बाबा निजामुद्दीन मुजावर,अंजुमन सोसायटीचे अध्यक्ष फीरोज पल्ला,सामाजिक कार्यकर्ते शामराव पाटील, शाळेचे प्राचार्य शेख आसेफ अकबर,संस्थेचे अध्यक्ष शेख लईथ अहेमद,बिलाल रजवी,अनिल जाधव,अदि उपस्थित होते.


 यावेळी चाईल्ड-लाईन उस्मानाबाद 1098 या टोल फ्री नंबरची जनजाग्रुती या विषयी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डाँ.दापके-देशमुख दिग्गज व स्त्री रोग तज्ञ डाँ.दापके-देशमुख वसुधा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गजानन पाटील व सुत्रसंचालन शागिर्द सर यांनी केले.तर मदार सर यांनी
मानले.या कार्यक्रमास शिक्षक,पालक,नागरिक, संस्थेचे पदाधिकारीव कार्यकर्ते मोठया संख्येने  उपस्थिती होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post